नांदेड| येथील रहिवासी प्रा. डॉ. रत्नमाला धुळे यांचा मुलगा डाॅ. असित वानखेडे याचे दि. ८ सप्टेंबर २०२५ सोमवार रोजी र्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. डाॅ. असित हे जिंतूर तालुक्यातील वझर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.


मृत्यू समयी त्यांचे वय २६ वर्ष होते. त्यांच्यावर मंगळवारी गोवर्धन घाट शांतीधाम येथे दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्राचार्य, प्राध्यापक, डाॅक्टर्स, इंजिनिअर्स यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची व नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शांत, सुस्वभावी असलेल्या डॉ. असित यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.




