देगलुर l आज दिनांक 24 आगस्ट 2025 रोजी स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने देगलूर पब्लिक स्कूल देगलूर आयोजित रक्तदान शिबीर आणि शाळेच्या मुलांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.


या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील पोलिस निरीक्षक मारोतराव मुंढे , युवा सेना तालुका प्रमुख तथा शिवसेना सोशल नेटवर्कर प्रमुख भागवत पाटील सोमुरकर यांनी प्रथमच अमुल्य, अतुल्य , दुर्मिळ असलेले A _ निगेटिव्ह रक्तगटाचे प्रथमच रक्तदान करुन रक्तदान शिबीराचे शुभारंभ केले.



या रक्तदान शिबीरात 50 जणांनी रक्तदान केले यावेळी युवासेना पदधिकारी , राहुल सोनकांबळे, श्रीमती संचालक सीमा इमरान शेख श्रीमती मिर्झा शिरीन बेग संचालक देगलूर पब्लिक स्कूल देगलूर कार्यक्रमात उपस्थित पाहुणे द क्रिसेन्ट ब्लड बँकचे महम्मद सोहेल मिर्झा मुमताज बेग सरपंच भायेगाव,पांचारे केंद्र प्रमुख शिक्षण अधिकारी, चांद मुजावर प्रा. डॉ.भीमराव माळगे प्रा.विकास जोंधळे , अजित पाटील, माधव मैलारे , यावेळी उपस्थित होते.




