नवीन नांदेड l सिडको येथील गोदावरी अर्बन बँक शाखेचे शाखाधिकारी गजानन पाटील यांच्या उत्कृष्ट आधिकारी म्हणून 12व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष आ.हेमंत पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


गोदावरी अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा 16 ऑगस्ट 25 रोजी पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या हस्ते 12 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्घाटन झाले तर संस्थापक अध्यक्ष आ.ना.हेमंत पाटील, संस्थाअध्यक्ष सौ.राजेश्री ताई पाटील, उपाध्यक्ष सौ.हेमलता देसले,सचिव रविंद्र रगटे, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर ,नांदेड दक्षिण माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, कळमनुरीचे माजी आमदार गजानन घुगे , साहित्यिक सुरेश सावंत,व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत नांदेड येथील भारत इ स्केवर नांदेड पाच राज्यांतील शाखेच्या जवळपास अधिकारी व कर्मचारी यांच्यी उपस्थितीती होती.

यावेळी सिडको शाखेने वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबविले,गरजु लोकांना साह्य,महिला अर्थ साक्षरता शिबिर,बचत गटाच्या माध्यमातून छोट्या व्यावसायिकांना कर्ज वाटप, आषाढी एकादशी निमित्त भाविक भक्तांना फराळाचे वाटप यासह अनेक उपक्रम राबवुन शाखा नावलोकीक केल्याबद्दल शाखाधिकारी गजानन देविदासराव पाटील यांच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह,व शाल श्रीफळ देऊन उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात आले.


हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सिडको शाखेचे संचालक साहेबराव मामीलवाड,ठेविदार सुभाष बोनगुलवार, यलप्पा कोल्हेवाड, जीवनराव शिंदे , केशव तोडे तुकाराम पांचाल, यांच्या सह सिडको शाखेचे दैनिक ठेव प्रतिनिधी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


