HomeकृषीCrops flooded due to heavy rain : अतिवृष्टीमुळे पिके जलमय – शेतकरी...

Crops flooded due to heavy rain : अतिवृष्टीमुळे पिके जलमय – शेतकरी हतबल, मदतीची मागणी

हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नदी–नाल्यातील तसेच उमट्यावरील शेतजमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. सलग पाण्यात राहिल्यामुळे कापूस, सोयाबीन, तुरीसह इतर पिके पिवळी पडून मर रोगाने ग्रासलेली दिसत आहेत.

IMG 20250820 WA0017 1 Crops flooded due to heavy rain : अतिवृष्टीमुळे पिके जलमय – शेतकरी हतबल, मदतीची मागणी

सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणी केली होती. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. अशातच पिके फुलावर आली असतानाच निसर्ग कोपला. गेल्या सहा ते सात दिवस सतत पाण्यात राहिल्यामुळे सोयाबीनच्या पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला असून, कापसावर लाल्या रोग वाढला आहे. तुरीची झाडे उभीउभी वाळू लागली आहेत.

20170903 Cotton CP CM Crops flooded due to heavy rain : अतिवृष्टीमुळे पिके जलमय – शेतकरी हतबल, मदतीची मागणी

या परिस्थितीमुळे शेतकरी राजा पूर्णपणे हतबल झाला आहे. यंदा फवारणीच्या खर्चाएवढेही उत्पादन निघेल की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत शासनाने द्यावी, तसेच कामचुकार कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.

कृषी विभागाविरोधात संताप
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, कृषी विभागाचे अधिकारी आणि कृषी सहाय्यक याकाळात मार्गदर्शन न करता केवळ पगारासाठी कार्यालयात येऊन सह्या करून वेळ घालवत आहेत. “उंटावरून शेळ्या हाकण्याचा कारभार सुरू आहे,” अशी टीका शेतकऱ्यांकडून होत आहे.

बैलपोळ्यावरही सावट
अतिवृष्टीच्या या संकटामुळे शेतकऱ्यांचा बैलपोळा सण साध्या पद्धतीने साजरा होत असून, उत्साहाऐवजी हताशतेचे वातावरण आहे. आतापर्यंत शासनाने कोणतीही मदत जाहीर न केल्यामुळे शेतकरी वर्ग शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments