Friday, June 26

Tag: farmers desperate

Continuous rain : हिमायतनगरात संततधार पाऊस सुरूच; सोयाबीन–कापूस धोक्यात, शेतकरी हतबल

Continuous rain : हिमायतनगरात संततधार पाऊस सुरूच; सोयाबीन–कापूस धोक्यात, शेतकरी हतबल

कृषी, नांदेड
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर तालुक्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाची संततधार सुरू असून, शेतकऱ्यांच्या शेतातील पिके होत्याचे न्हवते झाली आहेत. दोन दिवस उघडीप मिळाल्यानंतर पुन्हा बुधवारी पाऊस सुरू झाला. गुरुवारी दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. आभाळ सतत भरून असल्याने अजून मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. या अखंड पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सोयाबीनच्या शेंगा खराब झाल्या असून, कापसाची बोंडे काळवटली आहेत. यामुळे शेतकरी हतबल झाले असून, शासनाने जाहीर केलेली तुटपुंजी मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. ऑगस्ट महिन्यापासून वारंवार झालेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे बियाणे, खत, फवारणीवरचे पैसे वाया गेले आहेत. नदी–नाल्याकाठीच्या शेतात पूर वाहून गेला असून, बांध फुटले आहेत. अनेक ठिकाणी शेतं ओस पडली असू...
Crops flooded due to heavy rain : अतिवृष्टीमुळे पिके जलमय – शेतकरी हतबल, मदतीची मागणी

Crops flooded due to heavy rain : अतिवृष्टीमुळे पिके जलमय – शेतकरी हतबल, मदतीची मागणी

कृषी, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नदी–नाल्यातील तसेच उमट्यावरील शेतजमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. सलग पाण्यात राहिल्यामुळे कापूस, सोयाबीन, तुरीसह इतर पिके पिवळी पडून मर रोगाने ग्रासलेली दिसत आहेत. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणी केली होती. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. अशातच पिके फुलावर आली असतानाच निसर्ग कोपला. गेल्या सहा ते सात दिवस सतत पाण्यात राहिल्यामुळे सोयाबीनच्या पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला असून, कापसावर लाल्या रोग वाढला आहे. तुरीची झाडे उभीउभी वाळू लागली आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी राजा पूर्णपणे हतबल झाला आहे. यंदा फवारणीच्या खर्चाएवढेही उत्पादन निघेल की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्या...
error: Content is protected !!