Friday, June 26

Tag: demand help

Crops flooded due to heavy rain : अतिवृष्टीमुळे पिके जलमय – शेतकरी हतबल, मदतीची मागणी

Crops flooded due to heavy rain : अतिवृष्टीमुळे पिके जलमय – शेतकरी हतबल, मदतीची मागणी

कृषी, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नदी–नाल्यातील तसेच उमट्यावरील शेतजमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. सलग पाण्यात राहिल्यामुळे कापूस, सोयाबीन, तुरीसह इतर पिके पिवळी पडून मर रोगाने ग्रासलेली दिसत आहेत. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणी केली होती. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. अशातच पिके फुलावर आली असतानाच निसर्ग कोपला. गेल्या सहा ते सात दिवस सतत पाण्यात राहिल्यामुळे सोयाबीनच्या पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला असून, कापसावर लाल्या रोग वाढला आहे. तुरीची झाडे उभीउभी वाळू लागली आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी राजा पूर्णपणे हतबल झाला आहे. यंदा फवारणीच्या खर्चाएवढेही उत्पादन निघेल की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्या...
error: Content is protected !!