नरसी l येथून जवळच असलेल्या किनाळा येथे रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवात नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे.


रविवारी सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून लगेच साहित्य सम्राट डाॅ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती महोत्सवात अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते, सुप्रसिद्ध साहित्यिक व परखड वक्ते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचे व्याख्यान होणार आहे.


या कार्यक्रमास अ. भा. गुरु रविदास समता परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष पत्रकार गंगाधर गंगासागरे, लोकस्वराज्य आंदोलनचे देविदास सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड यांनी केले आहे.




