HomeनांदेडChief Minister Eknath Shinde ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास...

Chief Minister Eknath Shinde ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामे व प्रकल्पांचे भूमिपूजन – NNL

नांदेड| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर नांदेड विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रकल्पांचे आज भूमिपूजन केले. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुख्य कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष विकासकामांच्या ठिकाणी उपस्थित राहून भूमिपूजन केले.

विविध विकासकामे व प्रकल्पांचे भूमिपूजन 3 Chief Minister Eknath Shinde ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामे व प्रकल्पांचे भूमिपूजन - NNL

याप्रसंगी कार्यक्रमास सर्वश्री माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण, मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर,जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती.

विविध विकासकामे व प्रकल्पांचे भूमिपूजन 4 Chief Minister Eknath Shinde ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामे व प्रकल्पांचे भूमिपूजन - NNL

यामध्ये हनुमान गड परिसरातील राजमाता जिजाऊ सृष्टीचे लोकार्पण. कुसुम सभागृहासमोर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे भूमीपूजन. पावडे वाडी नाका परिसरातील परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन.

विविध विकासकामे व प्रकल्पांचे भूमिपूजन 1 Chief Minister Eknath Shinde ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामे व प्रकल्पांचे भूमिपूजन - NNL

नांदेड येथील वाडी उपजिल्हा रूग्णालयाच्या मुख्य इमारतीचे तसेच परिचारिका वसतिगृहाचे भूमीपूजन. पिपल्स व सायन्स कॉलेज परिसरातील कै. नरहर कुरूंदकर यांचे नांदेड येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या बांधकामाचे भूमीपूजन. यासह लेबर कॉलनीतील पाणी पुरवठा सक्षमीकरण व बळकटीकरणाचे भूमीपूजन यासह शहरातील शेतकरी चौक, तरोडा नाका येथे विविध रस्त्यांसाठी भूसंपादनासह सुधारणा आदी कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री यांनी केले.

विविध विकासकामे व प्रकल्पांचे भूमिपूजन 6 Chief Minister Eknath Shinde ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामे व प्रकल्पांचे भूमिपूजन - NNL

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments