नांदेड। किडनी प्रत्यारोपण पुणे मुंबई हैदराबाद येथे जाण्याची गरज नाही .नांदेड मधील श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ शहाजी जाधव यांच्यामुळे या रोगावर उपचार येथेच मिळत आहे. एका महिण्यात सलग दुसऱ्यादा
रुग्णास जीवदान देण्याचे काम या रुग्णालयाने केले आहे.. किडनी निकामी झाल्याचे समजताच हादरून गेलेल्या परंतु हिम्मत न हारता आपली एक किडनी भावाला देऊन त्याला नवे जीवन दिले. सख्खे भाऊ एकमेकांचे पाठीराखे असा बंधू प्रेमाचा प्रेमाचे संदेश त्यांनी समाजाला कृतीतून दाखवून दिला .किडनी तज्ञ डॉ शहाजी जाधव यांनी श्री गंगा हॉस्पिटल नांदेड येथे दुसरी यशस्वी किडनी प्रत्यारोपण केले.
तेलंगणा राज्यातील निर्मल येथील बलवंतराव राठोड (वय 43 ) हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते .एप्रिल महिन्यात त्यांना अंगावर सुजन येणे व दम लागत असल्यामुळे हैद्राबाद येथील आर्मी हॉस्पिटल मधील डॉक्टरांना दाखविले असता त्याच्या शरीरातील दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निष्पन्न झाले. हे ऐकून त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. कुटुंबानी पुढील उपचारासाठी रुग्णाला नांदेड येथील श्रीगंगा हॉस्पिटल येथील किडनी विकार तज्ञ आणि किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉ.शहाजी जाधव याना दाखवण्याचा निर्णय घेतला.
रुग्ण बळवंतराव ला घेऊन कुटुंब व नातेवाईक डॉ शहाजी जाधव यांच्याकडे आले . त्यांनी रुग्णाला ला किडनी प्रत्यारोपण करण्या शिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.त्यावेळी संपूर्ण कुटुंब हादरून गेले. त्यांचे मोठे भाऊ बाळाराम राठोड यांनी किडनी देण्याची तयारी दर्शविली. तपासणी झाल्या नंतर बाळाराम ची किडनी बलवंतराव च्या शरीरात दान करण्यास योग्य असल्याचे किडणी तज्ञ डॉ शहाजी जाधव यांनी नातेवाईकांना सांगितले त्यानंतर . संपूर्ण कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या .२ जून हा बलवंतरावसाठी दुसरा जन्मदिवस ठरला त्याच्या शरीरात भावाच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. झाल्यानंतर दोघांच्याही प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाल्याने संपूर्ण कुटुंबाने सुटकेचा श्वास सोडला. अख्खे राठोड कुटूंबियांनी डॉ जाधव याचे कृतज्ञता व्यक्त केली.
प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. राजीव राठोड , डॉ. शिवराज टेंगसे, डॉ. प्रमोल हंबर्डे तथा किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ. शहाजी जाधव भूल तज्ज्ञ डॉ. जयश्री कागणे, डॉ. अंजली गोरे, डॉ. पवन, डॉ. सतीश राठोड, डॉ. सोनाली राठोड यांनी अथक परिश्रमघेतले व किडनी प्रत्यारोपण यशस्वी केले.
श्री गंगा हॉस्पिटल चे संचालक अस्थीरोग तज्ज्ञडॉ राजेश्वर पवार डॉ. विजय कांगणे, डॉ. शहाजी जाधव,डॉ. संदीप गोरे, डॉ. लक्ष्मीकांत भोपळे, डॉ. मनीषा मुंडे, डॉ. सूचिता पेक्केमवार, डॉ. नामदेव चौरे, डॉ. चंदू पाटील, डॉ आशिष हटकर यांच्या संकल्पनेतून उभारलेले श्री गंगा हॉस्पिटल नांदेड परिसरातील किडनी रुग्ण व इत्तर सर्व आजरांच्या रुग्णासाठी एक वरदान ठरले आहे. गंगा हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणासाठी ची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे किडनी प्रत्यारोपणासाठी .पुणे -मुंबई हैदराबाद येथे जाण्याची आता गरज भासणार नाही एका महिन्यात दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण झाले.
डॉ शहाजी जाधव यांनी केल्या दीडशेहून अधिक किडनी प्रत्यारोपण–
किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ शहाजी जाधव हे नांदेडच्या शिवाजी नगर येशील श्री गंगा हॉस्पीटल येथे कार्यरत आहेत लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रेज्यूयट इंस्टीटूट ऑफ मेडीकल सायन्स हे देशातील सर्वात मोठे किडनी प्रत्यारोपण करणारी संस्था आहे .तेथे डॉ जाधव यांनी तीन वर्षे सेवा केली या काळात त्यांनी दिडशेहून अधिक रुग्णांचे किडनी प्रत्यारोपण केले आहे. सम रक्तगट व भिन्न रक्त गट अशा अनेक गुंता गुतीच्या व जटील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. नांदेड मध्ये दुसरी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली ते डॉ शहाजी जाधव व टीम यांच्यामुळे त्यामुळे या रोगाच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
●किडनी दान केल्याने “जीवनदान “मिळेल
ङाॅ. शहाजी जाधव ,श्री गंगा हॉस्पिटल नांदेड. बदलत्या जीवन शैलीमध्ये अचानक किडनी फेल होण्याचे निदान अंतिम टप्प्यात होत आहे. परंतु रुग्णांनी व कुटुंबातील सदस्यांनी घाबरून न जाता किडनी दान करण्याची तयारी दर्शविल्यास रुग्णाचे प्राण वाचतील व तो सामन्य आयुष्य जगू शकतो. शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत मिळते. त्यामुळे असल्याने आर्थिक ताणही कमी होतो .असे डॉ शहाजी जाधाव यांनी प्रतिक्रिया नोंदविली.
भावामुळे आयुष्य “बलवत्तर “
कोण कोणाचा भाऊ नसतो असे तिरस्काराने बोलणाऱ्या समाज व्यवस्थेत भाऊ पाठीराखा असतो हेच बाळाराम यांनी दाखवून दिले. भाऊ बलवंतराव राठोड याची किडनी निकामी झाल्याचे जेव्हा मला कळले तेव्हा मला ( मोठा भाऊ बाळाराम ) समजले .परंतु किडनी तज्ज्ञ डॉ शहजी जाधव यांनी धीर दिला व मार्गदर्शन केले किडनी दान करून माझ्या भावाचे प्राण वाचवू शकलो . डॉ शहाजी जाधव व श्री गंगा हॉस्पिटल येथील डॉक्टरांचे फार मोठे उपकार आमच्या कुटुंबावर आहेत .असा भावना किडनी दान देणारा भाऊ बाळाराम यांनी व्यक्त केल्या .भावामुळे मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेल्या “बळवंत” यांचे आयुष्य भाऊ बाळाराव”यांच्यामुळे “बलवत्तर झाले .