भावाने भावाला “किडनी ” दिली व आयुष्य “बलवत्तर “केले; नांदेडच्या श्री गंगा हॉस्पिटल येथे दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण -NNL
नांदेड। किडनी प्रत्यारोपण पुणे मुंबई हैदराबाद येथे जाण्याची गरज नाही .नांदेड मधील श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ शहाजी जाधव यांच्यामुळे या रोगावर उपचार येथेच मिळत आहे. एका महिण्यात सलग दुसऱ्यादा
रुग्णास जीवदान देण्याचे काम या रुग्णालयाने केले आहे.. किडनी निकामी झाल्याचे समजताच हादरून गेलेल्या परंतु हिम्मत न हारता आपली एक किडनी भावाला देऊन त्याला नवे जीवन दिले. सख्खे भाऊ एकमेकांचे पाठीराखे असा बंधू प्रेमाचा प्रेमाचे संदेश त्यांनी समाजाला कृतीतून दाखवून दिला .किडनी तज्ञ डॉ शहाजी जाधव यांनी श्री गंगा हॉस्पिटल नांदेड येथे दुसरी यशस्वी किडनी प्रत्यारोपण केले.
तेलंगणा राज्यातील निर्मल येथील बलवंतराव राठोड (वय 43 ) हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते .एप्रिल महिन्यात त्यांना अंगावर सुजन येणे व दम लागत असल्यामुळे हैद्राबाद येथील आर्मी हॉस्पिटल मधील डॉक्टरांना दाखविले अस...
