नांदेड| येथील बाबा नगर हाऊसिंग सोसायटी परिसरातील सुप्रसिद्ध अशा सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे अंगारकी चतुर्थी व सिद्धिविनायक मंदिर प्रतिष्ठापनेच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ सदिच्छा वैजू सोनी (पाटील) यांच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मगनपुरा ,बाबा नगर ,आनंद नगर,दयानंद नगर,नवा मोंढा, वसंतनगर या भागासह शाहूनगर जवाहरनगर, हर्ष नगर येथील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला.



या महाप्रसादाचे आयोजन या परिसरातील भारतीय जनता पक्षाच्या सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. सदिच्छा वैजू सोनी – पाटील यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी सिद्धिविनायक गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीपराव कल्याणकर, उपाध्यक्ष आनंदराव खानसोळे यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री संजय कौडगे, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी , भाजपाचे उत्तर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, भाजपाचे कार्यकर्त्या सौ.सदिच्छा वैजू सोनी -पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.



सिद्धिविनायकाच्या भंडाऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी परिसरातील उत्तमराव मामीडवार, नागनाथ डहाळे, संजय कहाळे, संतोष पिंपळगावकर, विनोद कोंडावार, सुनील पत्रे, सतीश खानसोळे, शिवानंद कदम, सतीश राऊतखेडकर, प्रभाकर कुलकर्णी आशा उगले, कुंताबाई काळे, शैलजा घाळे, अनुराधा घाळे, संगीता पत्रे, मनीषा पिंपळगावकर, जयश्री पतंगे, गोदावरी पेडगाळ, प्रणिता कल्याणकर, सुकेशना गारोळे, रेखा सोनी, सोनिया ठाकुर शक्ति ठाकुर,संतोष स्वामी,आनेराज क़कुर्ले,गोपाल भालेराव, किशोर बोंढारे,विशाल खदारे ,विक्रम चव्हाण, प्रशांत अंकरला ,अमोल हम्बर्डे, रवि गारोळे, जसपालसिंघ कोल्हापुरे यांच्यासह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले.




