Wednesday, May 13

CIDCO ; भाजपा महानगर कार्यकारिणी सह विविध आघाडीचा नियुक्तावर सिडको परिसरातील निष्ठावंत पदाधिकारी यांच्यी वर्णी

नवीन नांदेड l भाजपा महानगर कार्यकारिणी व विवीध आघाडीचा समिती प्रमुख पदाधिकारी पदी सिडको हडको सह विविध भागातील निष्ठावंत व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते यांच्यी वर्णी लागल्यामुळे आगामी मनपा निवडणूक पुर्वी नियुक्ता मुळे नवचैतन्य पसरले आहे.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ.अजितराव गोपछडे, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या शिफारशीनुसार भाजपा महानगर नांदेड शहर जिल्हा अध्यक्ष माजी आ.अमरभाऊ राजूरकर यांनी भाजपा महानगर कार्यकारिणी घोषित केली.

यात नवीन नांदेड भागातील व भाजपा निष्ठावंत पदाधिकारी यांच्यी नियुक्ती केली,यात उपाध्यक्ष पदावर माजी नगरसेवक प्रतिनिधी तथा युवा नेते संजय पाटील घोगरे, सामाजिक चळवळीतील अग्रगण्य असणारे वैजनाथ देशमुख, भाजपा एकनिष्ठ पदाधिकारी सिध्दार्थ धुतराज, यांच्यी नियुक्ती केली आहे तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून तिसऱ्यांदा धिरज स्वामी यांची नियुक्ती केली आहे.

ओबीसी जिल्हा महानगर अध्यक्षपदी विविध धार्मिक, राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर विनोद कांचनगिरे, तर विकासात्मक कार्यात व सामाजिक बांधिलकी जोपासणारे माजी नगरसेवक संजय इंगेवाड यांच्यी एस.टी. मोर्चा महानगर अध्यक्ष, तर नांदेड तालुक्यातील विविध कामात अग्रेसर व कर्तव्यदक्ष बाभुळगाव ग्रामपंचायत सरपंच पुंडलिक मस्के यांच्यी ,अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष नवनाथ कांबळे यांच्यी फेर नियुक्ती करण्यात आली आहे, सदरील नियुक्ती मुळे माजी लोकप्रतिनिधी, निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संधी मिळाल्यामुळे भाजपा पदाधिकारी सह कार्यकर्ते यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!