नांदेड| जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी.,एम.ए.,एम.एस.सी. अशा बिगर व्यावसायिक प्रथम वर्षातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांनी सन 2025-26 या वर्षांसाठी शासकीय वसतिगृह योजनेचे ऑनलाईन अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 17 ऑगस्ट 2025 पर्यंत भरावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.


इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना सुरू आहे. वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता भोजन निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येते.


प्रलंबित प्रतिवेदन, ई-चालन संदर्भात 13 सप्टेंबर रोजी लोकअदालत
नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रलंबित प्रतिवेदन, ई-चालन यासंदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने शनिवार 13 सप्टेंबर 2025 रोजी लोकअदालत आयोजित केली आहे.


प्रलंबीत प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आयोजित केलेल्या या लोकअदालतमध्ये वाहनचालक, मालकांनी उपस्थित रहावे व तडजोड पद्धतीने आपल्या वाहनासंबंधी प्रकरणाचा निपटारा करावा. या उपलब्ध सुविधेचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.



