नवीन नांदेड l साईबाबा मित्र मंडळ कौठा नांदेड यांच्या वतीने श्रावणमासा निमित्ताने साईबाबा मंदिर कौठा येथे 7 ऑगस्ट रोजी विधीवत महापुजा व महाआरती नंतर दुपारी 12 वाजता महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित अनेक भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घेतला.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावणमास निमित्ताने माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद धोंडिबाराव काकडे,अशोक बाबुराव दिलेराव, हेमराज सागर लडडा,माधव रामराव गुरू पवार, रमेश हरिचंद्र यादव, आकाश आणि साकेत व्यवहारे यांच्या वतीने या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.


सकाळी 12वाजता महाआरती झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांनी व वसरणी परिसरातील अंध शाळेतील विद्यार्थी सह परिसरातील अनेक विद्यार्थी यांनी लाभ घेतला महाप्रसाद निमित्ताने विनोद धोंडीबाराव काकडे यांनी साईबाबांचे विधीवत पूजन करून महाअभिषेक केला, देवराव काकडे,गणेश काकडे,माधव गुरूपवार ,अशोक दिलेराव ,मोहन औसुरे यांच्या सह मित्र मंडळ पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.




