उस्माननगर, माणिक भिसे l येथून जवळच असलेल्या मौजे नागबर्डी ता . कंधार येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही नागोबा मंदिरात याठिकाणी नागपंचमीच्या दिवशी नागराजाची मोठी यात्रा भरत – आसते. येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.


नागोबा मंदिर पंचक्रोशीतील भाविकांचे – श्रद्धास्थान असून याठिकाणी – जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील – हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. त्याठिकाणी पूर्वीपासून एक प्रथा रूढ आहे त्या परिसरात कोठेही साप आढळल्यास त्याला मारले जात नाही व तेथील परिसरातील – शेतीतील कडूलिंबाच्या झाडास चुकूनही शेतकरी त्याची (कत्तल) मोडुन टाकत नाहीत .



व सरपण म्हणून त्याचा उपयोग करत नाहीत. जीर्ण झालेले एखादे लिंबाचे झाड जर उन्मळून पडलेच तर ते जागेवरच कुजले जाते, ही प्रथा त्याठिकाणी आजही सुरू आहे. यंदा ही यात्रा दि.२० जुलै रोजी संपन्न झाली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी याठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती. त्यामुळे दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. तसेच रस्त्याच्या दोन्ही दुतर्फाने वाहनांच्या लांबच – लांब रांगा लागल्या होत्या. यात्रेत व्यापारी वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने दाखल झालेला होता.



तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व दिग्गज नेत्यांनी नागोबा चे दर्शन घेतले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ अधिकारी नांदेड व कंधार लोह्याच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलपत्रेवार , पोलिस उपनिरीक्षक गाडेकर , सपोउनि सुर्यवंशी , व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.

शिस्त बध्द यात्रा नागबर्डी येथे नागपंचमी च्या दिवशी दरवर्षी श्रध्दाळू भाविकांची गर्दी होत असल्याने प्रत्येक येणाऱ्या भक्ताला त्रास होणार नाही याची काळजी म्हणून मंदीरा जवळ होणारी गर्दी यावर्षी कमी करून विविध प्रकारचे येणारे स्टाॅल यामध्ये हाँटेल ,प्रसाद विकणारे , खेळणे आकाश पाळणे , ज्याचा त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी थाटून भाविकांना दर्शनासाठी जाग मोकळी केली.
मोटारसायकल साठी वेगळी पार्किंग महामार्गाच्या दोन्ही बाजूला दोन चाकी वाहनांसाठी, वेगळी जागा, चार चाकी वाहनांसाठी दुसरीकडे जागा उपलब्ध करून दिली असल्याने भाविकांना मनसोक्त यात्रेचा आनंद घेताना दिसून आला यावेळी सायंकाळ पर्यंत भाविकांची गर्दी ये जा चालूच होती.


