Nagoba Temple ; नागबर्डी येथे नागोबा मंदीरात दर्शनासाठी श्रध्दाळू भाविकांची रांगच रांग
उस्माननगर, माणिक भिसे l येथून जवळच असलेल्या मौजे नागबर्डी ता . कंधार येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही नागोबा मंदिरात याठिकाणी नागपंचमीच्या दिवशी नागराजाची मोठी यात्रा भरत - आसते. येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.
नागोबा मंदिर पंचक्रोशीतील भाविकांचे - श्रद्धास्थान असून याठिकाणी - जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील - हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. त्याठिकाणी पूर्वीपासून एक प्रथा रूढ आहे त्या परिसरात कोठेही साप आढळल्यास त्याला मारले जात नाही व तेथील परिसरातील - शेतीतील कडूलिंबाच्या झाडास चुकूनही शेतकरी त्याची (कत्तल) मोडुन टाकत नाहीत .
व सरपण म्हणून त्याचा उपयोग करत नाहीत. जीर्ण झालेले एखादे लिंबाचे झाड जर उन्मळून पडलेच तर ते जागेवरच कुजले जाते, ही प्रथा त्याठिकाणी आजही सुरू आहे. यंदा ही यात्रा दि.२० जुलै रोजी संपन्न झाली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी याठिकाणी ...
