Wednesday, May 13

IIPA : आयआयपीएच्या नांदेड शाखेची निवडणूक संपन्न

नांदेड| इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन नवी दिल्ली (आयआयपीए) ही भारत सरकारच्या कर्मचारी, लोकतक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालयाअंतर्गत लोकप्रशासन विकास, प्रशिक्षण, संशोधन व प्रशासकीय सुधारणा या महत्वपूर्ण क्षेत्रात कार्य करणारी एक मूलभूत संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे.

केंद्र शासनाच्या भारतीय लोकप्रशासन संस्था ( आय.आय.पी. ए.) नवी दिल्ली यांच्याकड़ून नांदेड येथे स्थानिक शाखेला स्थापन्यास मान्यता प्राप्त झाले असल्याची माहिती आयआयपीए नांदेड शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिली आहे. या महत्वपूर्ण संस्थेच्या इतर पदाधिकारी यांची निवड करण्यासाठी नांदेड स्थानिक शाखेची सर्वसाधारण सभा व निवडणूक प्रक्रीया नुकतीच संपन्न झाली आहे.

आयआयपीए नांदेड संस्थेच्या शाखा उपाध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची तर सचिवपदी देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग व संशोधन केंद्रप्रमुख प्रा. डॉ. बी आर कतूरवार कोषाध्यक्षपदी प्रतिभा निकेतन महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ.दीपक सुभाष वाघमारे आणि कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून महात्मा फुले महाविद्यालय, मुखेड येथील प्रा.डॉ. चांदोबा कहाळेकर व प्रा. डॉ. रवी बरडे यांची निवड करण्यात आली आहे. प्रस्तुत निवडणूक प्रक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर आणि निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कुमार बाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयआयपीएच्या या शाखेद्वारे जिल्हा प्रशासनातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देण्यासाठी, प्रशासकीय क्षमता बांधणी विकसित करण्यासाठी आणि प्रशासकीय सुधारणेच्या अनुषंगाने लोकप्रशासन विषयात लेखन, संशोधन व प्रशिक्षण इत्यादी विविध कार्य करण्यासाठी विशेष उपक्रम राबविन्यात येणार आहेत.

नांदेड जिल्ह्यामध्ये आयआयपीएची शाखा स्थापन झाल्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करणे, माहिती व तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासकीय सेवा सुलभ, पारदर्शक व गतीशील बनविने, विविध विकास कामांमध्ये लोकसहभाग वाढविणे, प्रशासकीय अधिकारी वर्गांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन शारीरिक, मानसिक, बौद्धिक व नैतिक क्षमता विकसित करणे, लोककल्याणकारी, संवेदनशील व लोकाभीमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरनार आहे. जिल्हा प्रशासनातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, लोकप्रशासन विषयाचे प्राध्यापक व संशोधक, नागरिक यांच्यात विचारमंथन करण्यासाठी आय आय पी ए ची नांदेड शाखा एक वरदान ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!