हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगरचं श्री परमेश्वर महादेव मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर एक पवित्र धाम आणि तीर्थक्षेत्र देखील आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. वर्षातून तीन दिवस सतत कथा होणं, हे महाराष्ट्रात पहिला गाव म्हणजे परमेश्वराची वाढोणा नगरी आहे. नित्य पूजा-अर्चा, आणि स्थानिक भाविकांचा नित्यसंग हे सर्व या स्थळाला सामान्य मंदिरांपेक्षा वेगळं आणि तीर्थाचे स्वरूप प्राप्त करून देत. त्यामुळे सर्वांनी इतर कोणत्या मंदिरात दर्शनाला नाही गेलं तरी चालेल मात्र सर्व तीर्थाचं धाम असलेल्या श्री परमेश्वराच्या दर्शनाला नित्यनेमाने येत चला असे असे उदगार भागवताचार्य सारंग चैतन्यजी महाराजांनी काढले.


पुढे मार्गदर्शन करताना स्वामीजी म्हणले कि, भागवत केवळ ग्रंथ नव्हे “भागवत ही ज्ञानाची गंगा आहे.
तिला बोलवावं लागत नाही, ती आपोआप येते.” जिथे श्रद्धा असते, जिथे मन शुद्ध असतं, तिथे भागवत आपोआप येते. जणू काही गंगा पर्वत सोडून पायाशी उतरावी. गंगेप्रमाणे भागवतही पवित्र करते, उगमावर नेते आणि अंतःकरण स्वच्छ करते. त्यासाठी प्रत्येकाने भागवत कथा श्रवण करावी यासाठी घरामध्ये रिकामे बसून टीव्हीचे सिरीयल बघण्यापेक्षा प्रत्यक्ष कथेच्या मंडपात येऊन कथा ऐकून भाग्याचा असता असेही स्वामीजी म्हणाले.



“धाम” म्हणजे जिथे देवाचं विशेष वासस्थान असतं. “तीर्थ” म्हणजे जिथे पवित्रता आणि अध्यात्म एकत्र नांदतं. त्यामुळे हिमायतनगरचं हे मंदिर हळूहळू मराठवाड्यातील एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र बनतं आहे. परमेश्वर महादेवांचा प्रभाव, भक्तांची श्रद्धा, आणि गुरुकृपेचा प्रवाह यामुळे हे ठिकाण खऱ्या अर्थानं धाम-तीर्थ आहे. त्यामुळे सर्वांनी इतर कोणत्या धामाला गेल्या नाही तरी चालेल मात्र सर्व तीर्थाचं धाम असलेल्या श्री परमेश्वराच्या दर्शनाला नित्यनेमाने येत चला असे आवाहन भागवताचार्य सारंग चैतन्यजी महाराजांनी केले. कथेच्या दुसऱ्या दिवशी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कथा श्रवण केली.यावेळी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष श्रोतेगण उपस्थित होते.



तहसीलदार टेमकर यांनी घेतलं श्री परमेश्वर दर्शन; केली मंदिर नियोजनाची पाहणी


हिमायतनगर येथील प्रसिद्ध श्री परमेश्वर मंदिरास तहसीलदार तथा मंदिराच्या पदसिद्ध अध्याक्षा पल्लवी टेमकर यांनी श्रावण सोमवारी भेट देत श्री परमेश्वराचे दर्शन घेतले. आणि मंदिर परिसरातील नियोजन, सुविधा व भक्तांसाठीच्या व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंदिर समितीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्याशी चर्चा करून आगामी धार्मिक कार्यक्रम, श्रावण उत्सव, व भाविकांच्या सुविधांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनां बाबत माहिती घेतली. त्यांनी स्वच्छता, पाणी, पार्किंग, आणि शिस्तबद्ध दर्शन यावर भर देण्याचं सूचित केलं. तहसीलदारांनी यांनी भागवतचार्य सारंग चैतन्यजी महाराज यांची भेट घेऊन विचारपूस केली.


