नांदेड| येथील ऐतिहासिक गुरुद्वारा लंगर साहिब च्या वतीने आज ४ ऑगस्ट रोजी नांदेड येथे सालाना बरसी उत्सव होत आहे. यानिमित्त नागिणा घाट परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त होणार आहे.


सालाना बरसी साठी भव्य दिव्य असा शामियाना उभारला जात आहे.. पंजाब सह देश विदेशातील अनेक संत महापुरुष व भक्त मंडळी सालाना बरसी उत्स वात सहभागी होण्यासाठी नांदेड येथे डेरेदाखल होत आहेत. लंगर साहिब गुरुद्वाराचे प्रमुख जत्थेदार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या वतीने हा सालाना बरसीचा उत्सव आयजित केला जातो.



लंगर साहिब गुरुद्वाराचे संस्थापक संत बाबा निधानसिंघजी, संत बाबा हरणामसिंघजी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शीशासिंघजी कारसेवावाले यांची सालाना बरसी साजरी करण्यात येत आहे. बरसी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम,कीर्तन, प्रवचन, रागी जत्थे, लंगर महाप्रसाद आदी कार्यक्रमाचा या उत्सवात समावेश आहे. सचखंड गुरुद्वाराचे मुख्य पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ व पंचप्यारे साहेबांन, संत बाबा गुरूदेवसिंघ शहिदीबाग आनंदपूर साहिब,नानकसर संप्रदाचे मुखी संत बाबा घालासिंघ, संत बाबा जोगा सिंघ कर्नालवाले, संत बाबा सतलानी अमृतसर,माता साहिब गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा तेजासिंघ, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक सरदारडॉ विजय सतबिर सिंघ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे कव्हरेज करण्यासाठी पंजाब व दिल्लीचा मीडिया पण दाखल झाला आहे.


मोफत दन्त चिकित्सा शिविर…
दरम्यान सालाना बरसी निमित्त 3 ऑगस्ट रोजी संत बाबा निधान सिंह जी मेमोरियल हॉस्पिटलतर्फे मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला भेट देऊन कोणतीही व्यक्ती मोफत वैद्यकीय उपचाराचा लाभ घेऊ शकते अशी माहिती शिबिराचे आयोजक बाबा अमरजितसिंघ टाटा यांनी दिली आहे.


