Homeक्राईमPolice Raid Godavari Riverbed : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात छापा :...

Police Raid Godavari Riverbed : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात छापा : दोन आरोपींनी सिनेस्टालाईन पाठलाग करून पकडले

नांदेड| गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्या रेती माफियावर नांदेड ग्रामीण पोलीसांनी छापा कारवाई करुन 21 लक्ष 75 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना पाहून काही आरोपी पळून गेले तर दोन आरोपींना पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून पकडले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कार्यवाहीमुळे रेती माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैधरित्या गौण खनिज (रेती) उपसा व वाहतुक करणारे लोकांवर कारवाई करणे बाबत आदेशित केले आहे. त्या अनुषंगाने ओमकांत चिचोलकर पोलीस निरीक्षक यांनी गोपनीय माहिती वरुन दिनांक 24 रोजी सायंकाळी सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन विष्णुपुरी शिवारातील गोदावरी नदीपात्रातुन छापा टाकला. काही रेती माफीया हे इंजिन व तराफ्याच्या सहाय्याने अवैधरित्या रेतीचा उपसा करुन रेतीची नदीकाठावर साठवणूक करीत असल्याचे आढळून आले. पाच ते सहा आरोपीनी पोलीसांना पाहून नदीमध्ये उडी मारुन पलीकडच्या किनाऱ्यावर पोहून पळून गेले.

IMG 20250725 WA0108 scaled Police Raid Godavari Riverbed : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात छापा : दोन आरोपींनी सिनेस्टालाईन पाठलाग करून पकडले

दोन आरोपी नदीपात्रातुन पोहून पळून जात असताना नदीपात्रात उड्या मारुन पोहत पाठलाग करत सिनेस्टाईलने त्या दोघांना पकडुन नदी काठावर आणुन ताब्यात घेतले, सदर ठिकाणी नदीपात्रातुन अवैधरित्या उपसा करुन किणाऱ्यावर आणुन साठविलेली अंदाजे 25 ब्रास रेती किंमत 1,25,000/- रुपये, पाण्यातुन रेती उपसा करणारे 06 इंजिन किंमत अंदाजे 12,00,000/- रुपये, रेती उपसा करण्यासाठी वापरलेले एकुण 17 तराफे किमत 8,50,000/- रुपये असा एकुण 21 लक्ष 75,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला काही मुद्देमाल आग लावुन जागीच नष्ट करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार वेगवेगळ्या चार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनीच्या कामगीरीचे अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments