HomeनांदेडCIDCO ; सिडकोतील मुख्य रस्त्या लगत जंगलाचे स्वरूप ,साईड पट्टे न टाकल्याने...

CIDCO ; सिडकोतील मुख्य रस्त्या लगत जंगलाचे स्वरूप ,साईड पट्टे न टाकल्याने वळण रस्त्यावर अपघाताची शक्यता..

नवीन नांदेड l सिडको मुख्य मार्गाचे काही वर्षापूर्वी सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले. परंतु वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गालगत साईड पट्टे टाकण्यात आले नसून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

जुना मोंढा नविन पूल ते सिडको मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर ते सिडको मार्गावरील वसंतराव नाईक महाविद्यालयासमोरील मार्ग हा वळणाचा असून अरुंद रस्त्यावरून जड वाहनांसह इतर वाहने मोठ्या प्रमाणात धावत असतात. तर विरोधी दिशेला मोठी दुकाने व वसाहत आहे.

दरम्यान ज्या ठिकाणी झाडे झुडुपे वाढून जंगल निर्माण झाले त्याच ठिकाणी मोठी नाली असल्याने अपघात घडल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो यासाठी संबंधित विभागाने तात्काळ झाडे नष्ट करून झाडे झुडुपे गरजेचा तोडावी अशी मागणी नागरीकासह वाहना धरकांकडून होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments