Wednesday, May 13

Tag: the possibility of accidents on the winding road due to the lack of side lanes.

CIDCO ; सिडकोतील मुख्य रस्त्या लगत जंगलाचे स्वरूप ,साईड पट्टे न टाकल्याने वळण रस्त्यावर अपघाताची शक्यता..

CIDCO ; सिडकोतील मुख्य रस्त्या लगत जंगलाचे स्वरूप ,साईड पट्टे न टाकल्याने वळण रस्त्यावर अपघाताची शक्यता..

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड l सिडको मुख्य मार्गाचे काही वर्षापूर्वी सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले. परंतु वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गालगत साईड पट्टे टाकण्यात आले नसून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जुना मोंढा नविन पूल ते सिडको मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर ते सिडको मार्गावरील वसंतराव नाईक महाविद्यालयासमोरील मार्ग हा वळणाचा असून अरुंद रस्त्यावरून जड वाहनांसह इतर वाहने मोठ्या प्रमाणात धावत असतात. तर विरोधी दिशेला मोठी दुकाने व वसाहत आहे. दरम्यान ज्या ठिकाणी झाडे झुडुपे वाढून जंगल निर्माण झाले त्याच ठिकाणी मोठी नाली असल्याने अपघात घडल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो यासाठी संबंधित विभागाने तात्काळ झाडे नष्ट करून झाडे झुडुपे गरजेचा तोडावी अशी मागणी नागरीकासह वाहना धरकांकडून होत आहे....
error: Content is protected !!