लोहा| स्व.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव संतोष वेणीकर याचा खारीक खोबऱ्याचा हार घालून जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच लोहयाचे भूमिपुत्र याच विद्यापिठाचे सहायक कुल सचिव पदमाकर पाटील याचाही गौरव करण्यात आला.


तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनावाखाली नाहिरेवाल्या “च्या पालात जाऊन नांदेड येथे जिल्हा पुरवठा अधिकारी असताना संतोष वेणीकर यांनी रेशन कार्ड व मतदान ओळखपत्र जाग्यावरच दिले.जात पंचायतीने बहिष्कृत केलेल्या नाथ गोसावी समूहाला सुद्धा राशन कार्ड वितरण केले.

तसेच सामाजिक दृष्टया बहिष्कृत महिलांना स्वस्त धान्य दुकान वाटप केले या असे अनेक सामाजिक दायित्व निभावत गरजवंताच्या ,उपेक्षितांच्या जीवनात “संतोष” निर्माण व्हावे यासाठी श्री वेणीकर यांनी कार्य केले त्याची दखल घेत राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांच्या टीमचा गौरव करण्यात आला .अनेक चढउतार याचा सामना करत श्री वेणीकर यांनी प्रशासनात असतानाही “उपेक्षितां पर्यंत शेवटच्या घटका पर्यंत ” शासकीय योजनाचा लाभ कसा पोहचता येईल यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत.


एक वर्षांपूर्वी परभणी च्या स्व.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे कुलसचिव म्हणून तयानी पदभार स्वीकारला. त्यांनी पारदर्शी प्रशासन करत अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले महत्वाचे निर्णय घेतले. जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र लोहा च्या वतीने कृषी विद्यापीठा चे कुलसचिव संतोष वेणीकर यांचा सेवानिवृत्त उप कार्यकारी अभियंता राजेंद्र टोके, मर्चंट बॅंकेचे संचालक हरिहर धुतमल, शीलानंद हटकर,वामन गोधने यांनी सत्कार केला. यावेळी सहायक कुलसचिव पद्माकर पाटील स्वीय सहायक रेणुकादास साखरे सहायक लेखाधिकारी सय्यद खालीस्क सहायक कक्ष अधिकारी ज्ञानेश्वर गमे याची उपस्थिती होती.

लोह्याचे भूमिपुत्र कृषी विद्यापीठाचे सहायक कुलसचिव पद्माकर पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यतत्पर तसेच अभ्यासू अधिकारी म्हणून भूमिपुत्र पद्माकर पाटील यांनी विद्यापीठ प्रशासनात आपल्या कार्य कर्तृत्ववाची छाप पाडली आहे. हे लोह्याचे भूमीपुत्र आसलेल्या पद्माकर पाटील यांचे कार्य या भूमीला अभिमान वाटावा असेच आहे.

