नांदेड| गत दोन वर्षांपासून वृद्ध साहित्यिक व कलावंतांच्या मानधन निवडीसाठीची राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय समिती पूनर्गठित करण्याच्या मागणीसाठी बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांच्या नेतृत्वात लोकपारंपारिक कलावंतांनी केलेल्या भजन आंदोलनाने आज पूनश्च जिल्हा परिषद दणाणली.पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्याकडे जिल्हाधिकारी तथा,सदरिल समितीचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर व जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी दिल्याने बहुजन टायगर युवा फोर्स च्यावतिने लोकपारंपारिक कलावंतांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरु केलेले आंदोलन तुर्त स्थगित केले. लोकपारंपारिक कलावंतांनी भजन आंदोलन करुन दि.१४ जुलै रोजी जिल्हा परिषद दणाणून सोडली होती.त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती.



अधिक माहिती अशी की,राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत सन् २०२३- २४ व सन् २०२४-२५ या दोन वर्षातील निवड रखडल्याने यासाठीची जिल्हास्तरीय समिती पूनर्गठित करण्याच्या मागणीसाठी बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांसह लोकपारंपारिक कलावंतांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आज पून्हा एकदा केलेल्या भजन आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणून सोडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार या भजन आंदोलनाची दखल घेऊन आंदोलनकर्त्याशी चर्चा करुन जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून याबाबत केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती दिली तसेच,यासाठी पूनश्च वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर,आंदोलनकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांचीही भेट घेतली.त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने जिल्हा परिषद कार्यालयासमोरील भजन आंदोलन तुर्त स्थगित करण्यांत आले.



या भजन आंदोलनात बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे,प्रदेश प्रवक्ता लक्ष्मणराव मा.भवरे,शाहीर माधव वाढवे,बाबुराव पाटील,शाहीर नरेंद्र दोराटे, रमेश नारलेवाड,शंकर गायकवाड,बापुराव जमधाडे,सुमेध एडके,सुभाष गुंडेकर,दिलीप कोसले,शेख खय्युम,गौतम राऊत,जगन्नाथ नरवाडे,चंद्रमुनी मुनेश्वर,सुगंध पाटील, शिवाजी डोखळे,अविनाश कदम,जळबा जळपते,नामदेव केंद्रे,रामजी यमलवाड,सुरेखा पाटील,लक्ष्मीबाई वालेगांवकर,सुरेखा माने,लक्ष्मीबाई जळपते, माया खिल्लारे,देविदास उदगिरे,देवराव पोतरे, बळीराम जाधव, जयश्री पोतरे,हिरामण जाधव, परमेश्वर वालेगांवकर,केशव माने,नामदेव जाधव, बालाजी राऊत,देविदास उदगिरे,परसराम राठोड, किशन ठमके,बालाजी वाढवे,केशव केंद्रे,दिलीप कांबळे,भीमराव पाटील,मुकिंद भगत,गणपत वासाटे, मुंजाजी जळपते,शाहीर विजय पवार आदींसह नांदेड जिल्ह्यातील शेकडो कलावंत आपल्या लोकपारंपारिक वेशभुषेत सहभागी झाले होते.



भिम टायगर सेनेचा पाठिंबा
दरम्यान भिम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी सहकांऱ्यासह लोकपारंपारिक कलावंतांनी सुरु केलेल्या या भजन आंदोलनात सहभाग नोंदवून पाठिंबा दिला.सोबतच,या मागणीसाठी आगामी काळात आम्हीही आंदोलनात्मक भूमिका घेऊ असे स्पष्ट केले.
आगामी काळात तिव्र आंदोलन
महत्वाचे म्हणजे,केवळ जिल्हास्तरीय समितीच्या पूनर्गठनाअभावी लोकपारंपारिक कलावंतांची गत दोन वर्षांपासून मानधनापासून परवड होत आहे.जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र च्यावतिने आगामी काळात तिव्र आंदोलन करणार असल्याचा ईशारा प्रदेश प्रवक्ता लक्ष्मणराव भवरे यांनी दिला आहे.



