HomeनांदेडMla Srijaya Chavhan ; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा - आ. श्रीजया...

Mla Srijaya Chavhan ; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा – आ. श्रीजया चव्हाणांची विधानसभेत मागणी

Provide financial assistance to the affected farmers – MLA Sreejaya Chavan’s demand in the Legislative Assembly मुंबई/नांदेड। भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी वादळी वाऱ्यांमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विशेषतः केळी उत्पादकांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याची मागणी आज विधानसभेत मांडली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले आहे.

आ. श्रीजया चव्हाण यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनांवरील चर्चेत ही मागणी केली. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या विषयाकडे त्यांचेही लक्ष वेधले. आपल्या निवेदनात आ. श्रीजया चव्हाण यांनी नमूद केले आहे की, ९ व १० जून रोजी नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर, मुदखेड, भोकर, हदगाव, देगलूर, कंधार, धर्माबाद, मुखेड इत्यादी तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे सुमारे ४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. विशेष करुन केळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे केळीच्या अनेक बागा संपूर्ण आडव्या झाल्या आहेत. प्रशासनाने पंचनामेही केले असून, मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर झालेला आहे.

या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांपैकी फक्त १ हजार ३१४ शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी मात्र पीक विमा घेतलेला नाही. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये विमा काढलेल्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना विमा कंपन्यांकडून जास्तीत जास्त भरपाई मिळवून देतानाच, विमा न काढलेल्या शेतकऱ्यांनाही, शासनाकडून लवकरात लवकर व जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments