Mla Srijaya Chavhan ; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा – आ. श्रीजया चव्हाणांची विधानसभेत मागणी
Provide financial assistance to the affected farmers - MLA Sreejaya Chavan's demand in the Legislative Assembly मुंबई/नांदेड। भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी वादळी वाऱ्यांमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विशेषतः केळी उत्पादकांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याची मागणी आज विधानसभेत मांडली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले आहे.
आ. श्रीजया चव्हाण यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनांवरील चर्चेत ही मागणी केली. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या विषयाकडे त्यांचेही लक्ष वेधले. आपल्या निवेदनात आ. श्रीजया चव्हाण यांनी नमूद केले आहे की, ९ व १० जून रोजी नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर, मुदखेड, भोकर, हदगाव, देगलूर, कंधार, धर्माबाद, मुखेड इत्यादी तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे सुमारे ४ ...
