MLA Sreejaya Chavan : नांदेड जिल्ह्यात केळीचे टिश्यू कल्चर सेंटर मंजूर करा – आ. श्रीजया चव्हाण यांची विधानसभेत मागणी
नांदेड| केळी उत्पादनाचा दर्जा व उत्पादकता वाढविण्यासाठी नांदेड जिल्ह्यात केळीचे टिश्यू कल्चर सेंटर मंजूर करण्याची मागणी आ. श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेत केली. (Approve banana tissue culture center in Nanded district - MLA Sreejaya Chavan's demand in the Legislative Assembly)
भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्रीजया चव्हाण यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना ही मागणी केली. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. केळी उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले तर त्यांच्या उत्पादनात अधिक वाढ होईल. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेड जिल्ह्यात केळीचे टिश्यू कल्चर सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. त्याला मान्यता देऊन आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यात यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. सदर टिश्यू कल्चर सेंटरच्या मागणीसाठी खा. अशोकराव चव...

