नांदेडराजकीय

Mla Balajirao Kalyankar ; वाडी ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देऊन या भागाचा सर्वांगीण विकास करा : आ. बालाजीराव कल्याणकर

नांदेड। नांदेड शहरालगत असलेल्या वाडी बुद्रुक या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा देण्याची प्रक्रिया शासकीय स्तरावर जवळजवळ पूर्ण झाली असून आता केवळ निवडणूक विभागाच्या अभिप्रायासाठी पत्र ठेवण्यात आले आहे . त्यामुळे निवडणूक विभागाचा अभिप्राय लवकरात लवकर मिळून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी वाडी बुद्रुकला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा अशी मागणी आ. बालाजीराव कल्याणकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

यापूर्वी नांदेड महानगरपालिकेमध्ये हद्दवाड करून तरोडा व सिडको चा भाग समावेश करण्यात आला . आज पर्यंत या भागाचा सर्वांगीण विकास झालेला नाही . या भागाला आलेल्या हद्दवाढ झालेल्या भागाचा विकास करण्यासाठी आलेला निधीचा वापर करून दुसऱ्याच भागातील विकास कामे करण्यात आला व हद्दवाढ करण्यात आलेला तरोडा व सिडको भाग आजपर्यंत जशास तसा ठेवण्यात आलेला आहे .

माझ्या नांदेड उत्तर मतदारसंघांमध्ये तरोडा भागाचा मी माननीय उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला भरघोस विकास निधी उपलब्ध करून दिल्यामुळे तरोडा भागाचा काही प्रमाणात मी विकास करू शकलो. उत्तर भागांमध्ये ड्रेनेज लाईन रस्ते व नाली या पद्धतीचे कामे मी करू शकलो . परंतु अजून सुद्धा दोन्ही तरोड्यांमध्ये भरपूर विकास काम होणे आवश्यक आहे व नांदेड दक्षिणच्या सिडको भागाचा पण विकास भरपूर होणे बाकी आहे . यापूर्वी हद्दवाढ झालेल्या भागाचा विकास आधी करण्यात यावा व त्यानंतरच नवीन हद्दवाढ मागण्यात यावी .

वाडी बुद्रुक ग्रामपंचायतीला नांदेड महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . कारण सध्याचे उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाच वाडी बुद्रुक ला नगरपंचायत चा दर्जा देण्यासाठीचे आदेश झालेले आहेत . निवडणूक आयोगाकडून त्यासंबंधीचे अभिप्राय सुद्धा मागविले आहेत व निवडणूक आयोगाच्या अभिप्रायस अधीन राहून शासनाने नगरपंचायतीस मान्यता दिलेली आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे अशी विनंती ही आमदार कल्याणकर यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान , कोणत्याही ग्रामपंचायतचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यासाठी अकृषिक रोजगाराची टक्केवारी २५ टक्के एवढी असणे अपेक्षित असते. वाडी बुद्रुक येथे येथील नगरपंचायत स्थापना करिता अकृषिक रोजगाराची टक्केवारी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी उदम नोंदणी नुसार प्रमाणित करून अहवाल सादर केला. त्यामध्ये वाडी बुद्रुक तालुका नांदेड येथील ग्रामपंचायतचे नगरपंचायत करण्याकरिता कृषिक रोजगाराची टक्केवारी 50 टक्के पेक्षा जास्त असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून आले . वाडी ग्रामपंचायत चा ठराव सुद्धा नगरपंचायत करण्याचा आहे.

महापालिकेमध्ये समावेश होण्यासाठी त्यांचा विरोध आहे .तालुका कृषी अधिकारी यांनी दिलेल्या अहवालामध्ये मौजे वाडी हे गाव नांदेड शहरालगत आहे व एकूण भौगोलिक क्षेत्र 1527 हेक्टर असून पैकी 1411 हेक्टर जमीन लागवडी लायक आहे . वाडी बु येथील लोकसंख्या 2011 च्या जनगणने नुसार 15971 एवढी आहे. त्यापैकी महिला 8370 पुरुष 8601 एवढी आहे आज रोजी सदरची लोकसंख्या अंदाजे 30 हजार एवढी आहे . वाडी बुद्रुक येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुद्धा मंजूर होऊन बांधकाम सुद्धा पूर्ण झालेले लेले आहे पद मान्यता सुद्धा झालेली आहे तीन ते चार महिन्यात 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय लोकांसाठी चालू करण्यात येईल.वाडी बु परिसरात 15 मंगल कार्यालय, 5 पेट्रोल पंप,30 मोबाईल टावर,22 शाळा व महाविद्यालय, वाडी बुवा येथे 40 नागरी वसाहत नगर आहेत.

याव्यतिरिक्त शॉपिंग मॉल डी मार्ट भारत ई-स्क्वेअर मोठमोठे कापड दुकाने मल्टिप्लेक्स थिएटर हे सर्व स्वतंत्ररित्या आहेत . नांदेड शहराच्या विकास आराखडा संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत आ. कल्याणकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button