HomeनांदेडPolice found in half an hour : रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या...

Police found in half an hour : रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या मुलीचा आर्ध्या तासात लावला शोध

उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर पोलीस्टेशन अंतर्गत येणारे उस्माननगर या गावातील १६ वर्षाची मुलगी रागाच्या भरात दि.२६ जून रोजी सकाळी ०७. ३० वाजता घरातून निघून गेल्यावर आईने सगळीकडे शोधाशोध केली. मुलगी कोठेही सापडली नसल्याने मुलीच्या आईने उस्माननगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती.

सदर फिर्याद पोलीस ठाणे अंमलदार सहा.पोलीस उपनिरीक्षक श्री मस्के यांनी नोंदवून ठाणे प्राभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांना माहीती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संजय निलपत्रेवार सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो.स्टे. उस्माननगर ,गजानन गाडेकर पोलीस उपनिरीक्षक, सुनिल सुर्यंशी पोउपनिरीक्षक , वडजे पो.हे.काॅ. ,डोळे व सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पो.हे.काॅ. सिटीकर यांच्या मदतिने लोकेशन प्राप्त केलं.

सदर लोकेशनवर पोलीस उपनिरीक्षक गाडेकर, पोहेका वडजे ,पोहेका डोळे यांना मुलीच्या आईसह पाठवून दिले असता सदर लोकेशनच्या आधारे क्रांती चौक, सिडको नांदेड याठिकाणी मुलगी मिळाली त्या मुलीस सुखरूप रित्या तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. पोलीसांनी लगेच चक्र फिरविल्याने अल्पवयीन मुलीला कोठे ही जिल्ह्याच्या बाहेर जाता आले नाही. कोणताही अनुचित प्रकार घडण्या आगोदर तिला सुखरूप ताब्यात घेवून अर्ध्या तासात आईच्या ताब्यात दिले आहे. उस्माननगर पोलिसांनी उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड यांनी उस्माननगर पोलीसांचे कौतुक केले आहे. गावक-यांच्या वतिने उस्माननगर पोलीस स्टेशनचे कौतुक होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments