Case registered : देगलूरमध्ये कृषी केद्रचालकाची शेतकर्यांना जीवे मारण्याची धमकी :गुन्हा दाखल

crime 3 Case registered : देगलूरमध्ये कृषी केद्रचालकाची शेतकर्यांना जीवे मारण्याची धमकी :गुन्हा दाखल

देगलूर, गंगाधर मठवाले| शेतात पेरणी केलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने सुडगी ता. देगलूर येथील शेतकरी दिगंबर पाटील यांनी कृषी दुकान चालकाकडे शेतकर्यांच्या पसदीच्या बियाण्याची मागणी केली. कृषी केंद्र चालकाने बियाणे न देता उलट शेतकर्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रारीवरून कृषी दुकानदारा विरोधात देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की देगलूर तालुक्यातील सुडगी येथील शेतकरी दिगंबर हणमंतराव पाटील यांनी 30 मे रोजी देगलूर शहराच्या मोढा बाजार परिसरात असलेल्या शिवक्रपा कृषी केंद्रातून सोयाबीन केडीएस 726 जातीच्या बॅगाची खरेदी केली. परंतु कृषी केद्र चालकाने 726 ऐवजी ७२६ किमया बियाण्याच्या बॅगा दिल्या. शेतकर्यांनी बियाण्याची शेतात पेरणी केल्यानंतर आठ ते दहा दिवसांत बियाण्याची उगवण होईल आशा भाबड्या आशेवर होता. माञ सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने दिगंबर पाटील यांनी कृषी केद्र चालक मन्मथ मारोती मके याच्याकडे जाऊन तुम्ही दिलेले बियाणे बोगस निघाले असुन, दुसरे बियाणे द्मा अशी मागणी केली.

यावेळी कृषी केद्र चालकाने शेतकर्यांना शिवीगाळ करून तुला काय करायचे ते करून घे पुन्हा सोयाबीनचे बियाणे दे म्हणुन दुकानला आल्यास तुला खत्म करतो. असे म्हणुन जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी शेतकर्यांसोबत जयराम नागना कायतवाड हे देखील उपस्थित होते. दिगंबर पाटील यांनी कृषी केद्र चालक मन्मथ मुके यांच्या विरोधात देगलूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, या तक्रारींवरुन पोलीसांनी कृषी केद्र चालका विरुद्ध भारतीय न्याय सहितेचया कलम 3५१(2) ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेख रिहाना ह्या पुढील तपास करीत आहेत कृषी चालकाच्या मुजोर पणामुळे तत्कालीन कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी काही दिवसांपूरता दुकान परवाना रद्द केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top