भोकर| शिवसेनेच्या 59 व्या वर्धापनदिनानिमित्त हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भोकर येथील दत्त गडावर वृक्षारोपण करण्यात आले तसेच भोकर येथील समाज प्रबोधन मंडळ संचलित निवासी अपंग विद्यालय भोकर येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.



सदरील कार्यक्रमास तालुकाप्रमुख माधव पाटील वडगावकर, माजी तालुकाप्रमुख प्रदिप दौलतदार , माजी तालुका संघटक नारायण पाटील पोमनाळकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख माधव करेवाड, सचिन पा. किन्हाळकर, सोहम शेट्टे, नागेश पिठलेवाड, अदिनाथ लुंगारे, माजी शहरप्रमुख सुनिल जाधव, जगदीश पाटील.गडदे, सुनिल पवार, श्याम पा.वानखेडे गजानन तवर, चक्रधर कदम, यांच्यासह मुख्याध्यापक वाय. व्हि.सोळंके व इतर कर्मचारी वर्ग, अजित बेले, ओंकार चिंताकुटे, पठाण अयाजखान हबिबखान यांच्यासह असंख्य विध्यार्थी हजर होते.




