HomeनांदेडMp ajit gopchade ; रेल्वे कामगार संघटनांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध :...

Mp ajit gopchade ; रेल्वे कामगार संघटनांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध : खा. डॉ. अजित गोपछडे यांनी रेल्वे कामगारांना केले आश्वासित

नांदेड। रेल्वेच्या विकासात आणि प्रवाशांच्या सेवेत सर्वाधिक परिश्रम घेणाऱ्या रेल्वे कामगार आणि पार्सल कामगार अर्थात हमालांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपण कटिबद्ध आहोत. यासाठी आपण रेलबोर्ड आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही पाठपुरावा करू आणि रेल्वे कामगार संघटनांचे सर्व प्रश्न सोडवून घेऊ असा विश्वास खा. डॉ. अजित गोपछडे यांनी आज दिला .
श्री हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवर आज व्हीआयपी कक्षात खा. डॉ. अजित गोपछडे यांचा भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी आणि भारतीय बहुजन कामगार संघ नांदेड रेल्वे डिव्हिजनच्या रेल्वे पार्सल सावकारी हमाल माथाडी कामगार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी रेल्वे पार्सल कामगारांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन खा. गोपछडे यांना देण्यात आले आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती प्रविणभाऊ साले, किशोर देशमुख, मारोती वाघ, दिलीपभाऊ ठाकुर, गोपाळराव माळगे, मारोती कुमार मोघेकर, सुरेश लोट, चंद्रकांत गंजेवार,मनोज जाधव, भुजंग कसबे, विनायक ,साबेर पटेल, गणेश गावंडे, जनार्दन ऐडके , अभिषेक माळगे , नागराज, तेजस माळगे, योगेश कांबळे, यांच्यासह कामगार संघटनेचे अनेक पदाधिकारी हमाल मापाडी संघटनेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामगार संघटनेचा सत्कार स्वीकारल्यानंतर खा. डॉ. अजित गोपछडे यांनी सर्व हमाल मापाडी यांच्याशी अत्यंत आत्मीय संवाद साधला . खा. डॉ. गोपछडे पुढे म्हणाले की , साउथ सेंट्रल रेल्वे डिव्हिजन अंतर्गत काम करणाऱ्या रेल्वे कामगार संघटनेला मी दत्तक घेतो आहे. या संघटनेच्या माध्यमातून जे प्रश्न मांडण्यात येतील , ज्या मागण्या करण्यात येतील त्या मागण्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. आगामी सहा वर्षाच्या काळात आपल्या सर्वांचे प्रश्न घेऊन रेल्वे मंत्रालयात ही आपण रेल्वे मंत्र्यांशी संवाद साधून , हितगुज करून आपल्या अधिकाधिक हिताचे निर्णय घेऊ असा विश्वास देताना रेल्वे पार्सल कामगार हमालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना सेवेत समाविष्ट करण्यात यावे , त्यांना रेल्वेचे पास मिळावेत , आरक्षण मिळावे , त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही रेल्वे प्रशासनाकडून आरोग्य सेवा मिळावी, हमालांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना उघड्यावरती आपले जीवन व्यतीत करावे लागते ही बाब लक्षात घेता त्यांना आराम करण्यासाठी निवास व्यवस्था निर्माण करुन देण्यासाठी आपला प्रयत्न राहील .

कर्मचाऱ्यांच्या स्वच्छता आणि सुरक्षेच्या अनुषंगाने ही आपण स्वतः लक्ष देणार असून केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याशी याबाबत लवकरच भेट घेऊन चर्चा करू असा विश्वास त्यांनी दिला . शिवाय गेल्या काही दिवसापासून सामान्यांची बंद असलेली रोटेगाव ही रेल्वे सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे . वंदे भारत रेल्वे येत्या महिन्याभरात नांदेड पर्यंत धावेल. शिवाय मुंबई – हैदराबाद अतिवेगाची रेल्वे सेवा सुरू करण्याचे अनुषंगाने आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरच डीआरएम आणि रेल्वे विभागाच्या जीएम सोबत आपली बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments