HomeनांदेडMaharashtra Natural Gas Company : नांदेडात गॅस पाईप लाईन टाकण्याच्या कामाची महाराष्ट्र...

Maharashtra Natural Gas Company : नांदेडात गॅस पाईप लाईन टाकण्याच्या कामाची महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीची जय्यत तयारी

नांदेड| औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) पाठोपाठ नांदेड शहरात नॅचरल गॅस पाईप लाईन टाकण्याचा 1200 कोटी रुपयांचा प्रकल्पाला केंद्र शासनाने मान्यता दिली. हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी माजी खासदार आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतला होता. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 8 वर्षांचा कालावधी लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याचे दायित्व केंद्र सरकारने महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला दिला आहे. नॅचरल गॅस कंपनीने गॅस पाईपलाईनच्या कामास लवकरच सुरुवात करणार असून मोठ्या प्रमाणात पाईप लाईनचा साठा धनगरवाडी येथील गोदाममध्ये उतरविण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्याचे खासदार असताना प्रतापराव पाटील चिखलीकर यांची केंद्रीय पेट्रोलियम समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नांदेड शहरातील प्रत्येक घर गॅस पाईपलाईनव्दारे जोडणारा 1200 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करुन आणला होता. बुलढाणा ते नांदेड 270 किमी पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. हा नॅचरल गॅस पाईपलाईनचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात 170 सीएनजी पंप उभारण्यात येणार असल्याची माहिती खा.चिखलीकर यांनी पत्रकारांना दिली होती.

नांदेडचा गॅस पाईपलाईन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीला मान्यता मिलाली असून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी आठ वर्षाचा लागणार आहे. गॅस पाईपलाईनचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील प्रत्येक घर गॅस पाईपलाईन कनेक्शनने जोडले जाणार आहे. सिलेंडर पेक्षा हा गॅस ग्राहकांना स्वस्त मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीला काम करण्याचे लायसन्स प्रदान केले आहे.

नांदेड गॅस पाईपलाईन प्रकल्पाच्या कामास नॅचरल कंपनीने सुरुवात केली आहे. शहरालगत असलेल्या धनगरवाडी येथे कंपनीचे गोदाम उभारण्यात आले आहे. कंपनीचे कार्यालय व अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करुन मोठ्या प्रमाणात गॅस पाईपलाईनसाठी लागणारे पाईप साठा करण्यास प्राधान्य दिले
आहे. त्यामुळे येत्या कांही महिन्यात गॅस पाईपलाईनच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात करण्याच्या कंपनीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments