HomeनांदेडDue to continuous rains, the bridge : सतंतधार पावसामुळे नरंगल ते कुरूडगीला...

Due to continuous rains, the bridge : सतंतधार पावसामुळे नरंगल ते कुरूडगीला जोडणारा पूल तुटला; गावकऱ्यांचा संपर्क तुटला…!

देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील नरंगल कुरूडगी परिसरात गेल्या आठ-दहा दिवसापासून संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पाणी आले आहे. त्यातच नरंगल ते कुरूडगी रस्त्यावरील पुल पडल्यामुळे कुरूडगी गावकऱ्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वीच या फुलाचे बांधकाम झाले होते त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी या निमित्ताने गावकऱ्यांनी केली आहे.

सदरील रस्त्यावरील पुल पडल्यामुळे शाळकरी विद्यार्थी नागरिक मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेले आहेत. देगलूर तालुक्यातील शेवटच्या टोकाचे कुरूडगी गाव आहे. पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे संततदार पावसामुळे पुल कोसळला आहे. याकडे देगलूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांनीही गावकऱ्यांच्या गैरसोहीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.

प्रशासनाने रूढ गिला जोडणाऱ्या पुलाचा प्रश्न तात्काळ निघाली काढून कुरूडगी गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी ही गावकरी करीत आहेत. येत्या काही दिवसात शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी गैर सोय होऊ नये याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

आमदारांचे फोटो सेशन…!
विद्यमान आमदार जिथे शांतापूरकर हे सध्या दुसऱ्यांदा निवडून आल्याने हवेतच वावरत आहेत ते फक्त उद्घाटनाच्या फोटो सेशनमध्ये गर्क असल्याचा आरोप मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकाकडून केला जात आहे याकडे आमदार महोदयांनी विशेष लक्ष देऊन ग्रामीण भागातील जनतेच्या समस्यांचा निपटारा करावा अशी मागणी यानिमित्ताने केली जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments