HomeनांदेडPandurang Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नायगाव तालुकाध्यक्ष पदी पांडुरंग...

Pandurang Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नायगाव तालुकाध्यक्ष पदी पांडुरंग शिंदे यांची नियुक्ती

नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी जिल्हा उपाध्यक्ष *पांडुरंग शिंदे मांजरमकर यांना नायगाव तालुकाध्यक्ष* पदाची जबाबदारी दिली.

पांडुरंग शिंदे हे गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी चळवळीमध्ये शेतकरी ,शेतमजूर, व ग्रामीण भागातील अनेक प्रश्न घेऊन सातत्याने आंदोलने करत आहेत. नायगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्यांची जाण असणाऱ्या आणि आक्रमक व अभ्यासू नेतृत्व म्हणून पक्षाने त्यांच्यावर तालुकाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही निवड महत्त्वाचे मानली जाते.

यावेळी जिल्हा सरचिटणीस डी.बी जांभरुणकर , महिला जिल्हाध्यक्ष प्रांजली रावणगावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष रावणगावकर,धर्माबाद तालुकाध्यक्ष दिलीप कदम, धर्माबाद शहराध्यक्ष जावेद जबोरोदिन,रवींद्र शेट्टी, बी.ए.गोणारकर, धर्माबाद महिला तालुकाध्यक्ष राजश्री सूर्यवंशी, धर्माबाद महिला शहर अध्यक्ष आरती चव्हाण, माजी नगरसेवक सुधाकर जाधव, महिला शहर उपाध्यक्ष मीना भद्रे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. सर्व स्तरातून पांडुरंग शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments