HomeनांदेडSchool books : शाळेची पुस्तके तालुक्यांमध्ये पोहोचली; शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार पुस्तकांचे वितरण

School books : शाळेची पुस्तके तालुक्यांमध्ये पोहोचली; शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार पुस्तकांचे वितरण

नांदेड| जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी जिल्ह्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.

यासाठी आवश्यक ती शालेय पुस्तके तालुकास्तरावर पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण 2 लाख 94 हजार 696 विद्यार्थ्यांसाठी तब्बल 17 लाख 12 हजार 640 पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी दिली.

JBJ 67 School books : शाळेची पुस्तके तालुक्यांमध्ये पोहोचली; शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार पुस्तकांचे वितरण

विभागीय पाठ्यपुस्तक भांडार, लातूर विभागामार्फत सदर पुस्तकांचे तालुकास्तरावर वितरण सुरू असून, आतापर्यंत तालुकास्तरावर 11 लाख 41 हजार 994 पुस्तके प्राप्त झाली आहेत. उर्वरित पुस्तकेही शाळा सुरू होण्याच्या आधी प्राप्त होणार आहेत. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी 16 जून रोजीच सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावर्षीपासून इयत्ता पहिलीसाठी CBSE पॅटर्न लागू करण्यात आला असून, त्यानुसार CBSE अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकेही यामध्ये समाविष्ट आहेत. तालुकास्तरावर थेट वितरण प्रणालीद्वारे माध्यम- मराठी, उर्दू, सेमी इंग्रजी, CBSE तसेच संस्कृत विषयांच्या पुस्तकांचे वितरण केले जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments