Thursday, May 14

Tag: on the first day of school

the first day of school : शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात रंगला गुलाबपुष्प स्वागताचा उपक्रम

the first day of school : शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात रंगला गुलाबपुष्प स्वागताचा उपक्रम

करियर, नांदेड
नांदेड| जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाच्या 100 शाळांना भेट उपक्रमांतर्गत आज जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासनातील अधिकारी, शिक्षक व पालक यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन तर नवागत पहिलीतील विद्यार्थ्यांना फुले, पुस्तके, पेन्सिल तसेच स्मरणघडी पत्रिका देऊन स्वागत करण्यात आले. खासदार अशोक चव्हाण यांनी भोकर येथील नूतन कन्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्‍यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी माहूर येथील केंद्रीय प्राथमि‍क शाळेस भेट देवून विद्यार्थ्‍यांना पुस्‍तकांचे वाटप केले. त्‍यांच्‍या हस्‍ते वृक्ष लागवड करण्‍यात आली. आमदार तथा बाळासाहेब ठाकरे हळद-हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी नांदेड तालुक्यातील पासदगाव शाळेला भेट दिली. आमदार प्रतापराव चि...
School books : शाळेची पुस्तके तालुक्यांमध्ये पोहोचली; शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार पुस्तकांचे वितरण

School books : शाळेची पुस्तके तालुक्यांमध्ये पोहोचली; शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार पुस्तकांचे वितरण

नांदेड, करियर
नांदेड| जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी जिल्ह्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती शालेय पुस्तके तालुकास्तरावर पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण 2 लाख 94 हजार 696 विद्यार्थ्यांसाठी तब्बल 17 लाख 12 हजार 640 पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी दिली. विभागीय पाठ्यपुस्तक भांडार, लातूर विभागामार्फत सदर पुस्तकांचे तालुकास्तरावर वितरण सुरू असून, आतापर्यंत तालुकास्तरावर 11 लाख 41 हजार 994 पुस्तके प्राप्त झाली आहेत. उर्वरित पुस्तकेही शाळा सुरू होण्याच्या आधी प्राप्त होणार आहेत. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी 16 जून रोजीच ...
error: Content is protected !!