HomeनांदेडLighting Strike one dead ; चालत्या मोटार सायकलवर विज कोसळली एक ठार;...

Lighting Strike one dead ; चालत्या मोटार सायकलवर विज कोसळली एक ठार; दूस-या घटनेत एक जखमी

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर तालूक्यात दि.१५ मे रोजी दू.२.३० वा अचानक विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावूस पडल्याने विज कोसळून संजय कुष्णकूमार पांडे वय ५६ रा.करंजी याचा जागेवरच मुत्यू तर आसोली येथील अमरसिंग रामजी चव्हाण वय ५६ हे जख्मी झाल्याची घटना घडली.

IMG 20250515 WA0027 Lighting Strike one dead ; चालत्या मोटार सायकलवर विज कोसळली एक ठार; दूस-या घटनेत एक जखमी

करजी ता.माहूर येथील रहिवासी संजय कुष्णकूमार पांडे हे हिवरा ता. महागाव येथे जिल्हा परीषद शाळेत शिक्षक आहेत. ते मोटार सायकलने उमरखेड येथे बहिनी कडे गेले होते व गावाकडे परत येत असतांना माहूर शहराजवळील मालवाडा घाटातून चालत्या मोटार सायकल क्र. एम एच २९ बि यस ४६८१ हिरो शाईन वर विज पडल्यांने त्याचा भाजून जागीच मुत्यू झाला तर त्याच्या जवळील मोबाइल जळून नष्ट झाला. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, पि एस आय संदिप आनेबोइनवाड यांनी घटनास्थळ गाठुन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय येथे आणला.

तर दुस-या घटनेत आसोली येथील अमरसिंग चव्हाण ( समाधान जाधव) याचे सालगडी हा अचानक आलेल्या पावसामुळे बैल सोडण्यास गेला असता काही अंतरावर विज पडल्याने त्याना आछ लागल्याने ते जख्मी झाले. माहूरच्या ग्रामीण रुग्णालय येथे जख्मी वर वैघकिय अधिक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे, डॉ बिपीन बाभळे यांनी उपचार केले व पुढील उपचार करीता यवतमाळ येथे पाठविले व डॉ बिपीन बाभळे यानी,संजय पांडे याचे शवविच्छेदन केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments