the short film “Sun” कमळेवाडीच्या भटक्या विमुक्तांच्या आश्रम शाळेतील इयता आठवीच्या विद्यार्थ्यांनी केली “ऊन ” लघुपटाची निर्मिती
लोहा| “माध्यमिक आश्रमशाळा कमळेवाडीच्या विद्यार्थ्यांनी ‘ऊन’ हा जो लघुपट तयार केला तो कदाचित आश्रमशाळेच्या इतिहासातील पहिला प्रयोग असावा. मुलं कल्पना करतात, कथा लिहितात, पटकथा लिहितात, संवाद लिहितात, दिग्दर्शन करतात आणि अभिनयही तेच करतात. ही एक अद्भूत गोष्ट असून, मुलांच्या अशा प्रतिभेला शिक्षकांनी जोपासून खतपाणी घातलं पाहिजे. “असे गौरवोद्गार सिने दिग्दर्शक तथा अभिनेते योगीसिंह ठाकूर यांनी काढले. ते माध्यमिक आश्रमशाळा कमळेवाडी येथे ‘ऊन’ (Eighth grade students produced the short film “Sun”) या लघुपटाच्या प्रदर्शनाप्रसंगी बोलत होते.


राज्यभरात विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या हजारावर आश्रमशाळा आहेत. या शाळांना व विद्यार्थ्यांना मागास ठरविल्या जातं. पण शाळेतल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून सर्जनात्मक निर्मिती करून घेता येते हे आश्रमशाळेचे कृतिशील शिक्षक प्रा शिवाजी अंबुलगेकर सिद्ध केले आहे.निर्मिती दिग्दर्शन मांडणी ,कथा या सगळ्या पातळीवर विद्यार्थ्यांनीच काम केले आणि लेकरांच्या प्रतिभेला प्रेरणेचे पंख मिळाले की ते उत्तुंग भरारी घेतात.याची प्रचिती आली.

मुखेड तालुक्यातील कमळेवाडी या ग्रामीण भागातल्या भटक्या विमुक्तांच्या माध्यमिक आश्रमशाळेत प्रा शिवाजीराव अंबुलगेकर हे उपक्रमशील शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला बळ देत असतात. मातृभाषेत पाठ्यपुस्तकातील कवितांचे लेखन, गावचा भूगोल ,निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त शिक्षण असे उपक्रम त्यांनी राबविले त्याच शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘ऊन’ या लघुपटाचं निर्माण केलं आहे. श्रीनिवास मुंडकर या विद्यार्थ्याला लघुपट निर्माण करण्याची कल्पना सुचली. मग त्याने कथा लिहिली. त्यावर रुद्र वाघमारे याने प्रसंग आणि संवाद लिहिले. गौरव होनवडजकर याने या लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे.


शाळेचे मुख्याध्यापक तथा निर्माते संदीप गेटकेवार सहनिर्माते शिक्षक राजकुमार मेहरकर व सिद्धांत कांबळे यांनी निर्मिलेल्या ‘ऊन’ या लघुपटात स्वयंदीप भारदे, आयोध्या डावकरे, पुष्कर भालके, आर्यन अनमुलवाड, रुद्र वाघमारे, श्रीनिवास मुंडकर आणि गौरव होनवडजकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.तर कपिल कुंकूनोर, सुमित राठोड, समर्थ ऐटवार, क्षितिज भद्रे आणि तुकाराम कुंडगीर हे यात सहायक कलावंत आहेत.

‘ऊन’ या लघुपटाच्या प्रदर्शन सोहळ्याप्रसंगी सिने अभिनेते तथा दिग्दर्शक योगीसिंह ठाकूर यांनी. स्वतःचे अनुभव कथन केले. सिनेक्षेत्रात काम करण्यासाठी केलेल्या मेहनतीचे अनुभव सांगितले. विद्यार्थ्यांनी लघुपटाचं निर्माण करण्याचं जे धाडस केलं, त्याचं त्यांनी कौतुक केलं. या उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रत्येकानं एक गोष्ट लिहावी, असं मुलांना त्यांनी आवाहन केलं चांगल्या गोष्टीवर या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत नवा लघुपट निर्माण करण्याचा संकल्पही व्यक्त केला.
“ऊन”लघु पटाची कल्पना अशी सुचली
इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांना मराठी आमचे मराठी विषयाचे शिक्षक शिवाजी आंबुलगेकर सरांनी गृहपाठ दिला होता. तो सोपा असूनही आम्ही केला नव्हता. त्यामुळे सर आमच्यावर रागावले आणि रुसले. ही एक खंत मनात होती. यापूर्वी सरांनी आम्हाला ‘संतुलन’ हा लघुपट बघण्याचा गृहपाठ दिला होता. तो मी बघितला. मग त्यातून प्रेरणा घेऊन मी ‘ऊन’ ही एक छोटी गोष्ट लिहिली.व शॉर्ट फिल्मची कल्पना सांगितली.व लघुपट तयार झाला. श्रीनिवास मुंडकर (कथाकार ‘ऊन’)
फोटो शूटिंग व एडिटिंग आवडत – दिग्दर्शक
सिनेमा आणि तो कसा तयार करतात याबद्दल कुतूहल होतं. कॅमेरा, फोटो, शुटींग, एडिटिंग हे मला खूप आवडतं. ‘ऊन’ या शॉर्ट फिल्मचा दिग्दर्शक गौरव रणजीत होनवडजकार यांनी सांगितले. मी डायरेक्शचा पुरेपूर आनंद घेतला. डायरेक्टर योगीसिंह ठाकूर यांनी केलेल्या मार्गदर्शनाने मी प्रभावित झालो.
आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी लघुपट निर्मिती प्रेरणादायी – प्रा शिवाजी अंबुलगेकर
कामलेवाडीच्या आश्रम शाळेतील इयत्ता 8 वी च्या विदयार्थ्यांनी माझ्याकडे ऊन हा लघुपट करत केला विदयार्थ्यांनी एवढी मेहनत घेऊन उत्कृष्ट लघुपट बनवला हे खूपच प्रेरणादायी आहे भविष्यात ही मुलं एखाद्या चांगल्या चिटपटामध्ये नक्कीच काम करतील. या लघुपटातून उष्माघात होण्यापासून बचाव करण्यासाठी जे आपले आई – वडील किंवा वरिष्ठ जे आपल्याला सांगतात खरच आपण त्यांचं ऐकलं पाहिजे हा एक छानसा संदेश समाजाला दिला असे प्रा अंबुलगेकर यांनी सांगितले.
आम्हाला अभिमान वाटतो – मुख्याध्यापक गेटकेवार
कमळेवाडीच्या भटक्या विमुक्तांच्या आश्रम शाळेतील आठवी वर्गातील मुलांनी शॉर्टफिल्म करण्याची परवानगी मागितली. माझ्या शाळेतील लेकरांनी ‘ऊन’ ही फिल्म तयार करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. याच अभिमान वाटतो असे त्याचे मार्गदर्शक शिक्षक अंबुलगेकर व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन



