नांदेड| दिनांक 11 रोजी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस पाटील मेळावा व कार्यशाळा आयोजित करण्यात आले . या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक सुरेश गुरव, श्री धरणे व इतर महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी जील्ह्यातील जिरोणा येथील पोलीस पाटील ज्योती प्रमेश्वर पवार (मिराशे) यांच्यासह विविध पोलीस पाटील यांचा सन्मान करण्यात आला.


सकाळी सात ते अकरा क्रिकेट सामने 11 ते 2 मान्यवरांचा सत्कार व लगेच माननीय न्यायाधीश मॅडम यांचे पोलीस पाटलांसाठी कायदेविषयक शिबिर मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर आदर्श पोलीस पाटील पुरस्कार सोहळा व 2 वाजता स्नेह भोजन झाले. त्यानंतर महिलांचे खेळ संगीत खुर्ची व तळ्यात मळ्यात असे इत्यादी खेळ संपन्न झाले. 3:30 वाजता फायनल क्रिकेटचा सामना भोकर डिव्हिजन विरुद्ध एस पि लेव्हल संघ असा झाला.

जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांचे प्रतिनिधित्व भोकर डिव्हिजन क्रिकेट संघाने केले. एसपी लेवल क्रिकेट संघाच्या सोबत अंतिम सामना झाला तो सामना अत्यंत चुरशीचा झाला आणि सर्व क्रिकेट प्रेमींनी,पोलीस पाटलांनी या सामन्याचा भरपूर आंनद घेतला आणि त्यानंतर लगेच व्हॉलीबॉल चा सामना झाला व्हॉलीबॉल पोलीस पाटील संघ विरुद्ध पोलीस अधिकारी संघ आणि या अधिकाऱ्यांच्या संघामध्ये सुरेश गुरव होते.

क्रिकेटचा अंतिम सामना झाला त्यात एसपी लेवल संघाने विजय मिळवला व व्हॉलीबॉल पोलीस पाटील संघ आणि पोलीस अधिकारी संघात झालेला सामना हा सामना पोलीस अधिकाऱ्यांनी जिंकले. त्यानंतर शेवटचा टप्पा बक्षीस वितरणाचा झाला विजयी संघाला ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले. पोलीस पाटलांना क्रिकेट,हॉलीबॉल बक्षीस मिळाले आणि महिला पोलीस पाटलांसाठी संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात खेळासाठी बक्षीस मिळाले. दिवसभरात अशा 4 टप्यात कार्यक्रम झाला.

नांदेड जिल्ह्यातील 34 पोलीस स्टेशनच्या आदर्श पोलीस पाटलांचा , मी सर्व प्रथम अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो असे मत महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष भास्करराव कंकाळ पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी ते म्हणले कि, आपल्या कृतत्वाने व आपल्या प्रामाणिक कामाची पावती तुम्हाला मिळाली याचा मला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने आदर्श पोलीस पाटील पुरस्कार सोहळा पार पडला. दिवसभर पोलीस प्रशासनाने पोलीस पाटलांचे सन्मान केले हा सन्मान आपल्या सर्वांना मिळाल्यामुळे आणि आपल्या कार्यकाळामध्ये हा कार्यक्रम सर्वप्रथम झाला. आदर्श पोलीस पाटील पुरस्कार मिळालेल्या सर्व पोलीस पाटलांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देत सर्वजण एका मेसेज वर सकाळी नऊ वाजता उपस्थित झालात. सर्व जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे व महिला पोलीस पाटलांचे धन्यवाद मानले.
जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांनी आपल्या पदावर असलेल्या कार्य काळामध्ये आपणही उत्तम कार्य करत भविष्यात तुम्हालाही सर्व पोलीस पाटलांना असेच आदर्श पोलीस पाटील पुरस्कार मिळो अशा सर्वांना मी पुढील काळासाठी शुभेच्छा देतो आणि सदिच्छा व्यक्त करतो. असे मत महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे राज्य संघटक संभाजी मंडगीकर पाटील यांनी मांडले.