Homeक्राईमAttempted theft at Borgaonkar's house : हिमायतनगर शहरातील बोरगावकर यांच्या घरी चोरीचा...

Attempted theft at Borgaonkar’s house : हिमायतनगर शहरातील बोरगावकर यांच्या घरी चोरीचा प्रयत्न, कुलूप तुटले नसल्याने चोरांचे प्रयत्न निष्फळ

हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील छत्रपती नगर, रेल्वे स्टेशन रोड, हिमायतनगर येथील रहिवाशी देशसेवेच्या कार्यात स्वतःला वाहून घेत जम्मू काशिमामध्ये ड्युटीवर असलेले रामकुमार ससाणे बोरगावकर यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून मध्यरात्री काही अज्ञान चोरट्यांनी चोरी करण्यासाठी घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना यश आले नाही. हा प्रकार CCTV कैमेऱ्यात कैद झाला आहे.

दरम्यान या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देण्यासाठी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. पोलीस ठाण्याला संपर्क करावा म्हटलं तर त्या ठिकाणी शासकीय दूरध्वनी क्रमांक नाही त्यामुळे इमर्जन्सी मध्ये नागरिकांनी पोलीस ठाण्यात कसा संपर्क साधावा असा सवाल पुढे येऊ लागला आहे. याकडे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी लक्ष द्यावे अशी मागणी रामकुमार ससाणे यांनी केली आहे.

IMG 20250308 170354 Attempted theft at Borgaonkar's house : हिमायतनगर शहरातील बोरगावकर यांच्या घरी चोरीचा प्रयत्न, कुलूप तुटले नसल्याने चोरांचे प्रयत्न निष्फळ

पोलिसांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन चोरांची ओळख पटवून मुसक्या अवळाव्यात जेणे करून शहरात चोरीचे प्रकार घडणार नाहीत, सीसीटीव्हीत दिसणाऱ्या चोरट्यांनी तोंडाला मुसक्या बांधल्या असल्याने त्यांना ओळखणं अवघड बनले असले, चोरट्यांच्या हालचाली वर पोलिसांनी लक्ष देऊन बंदोबस्त करावा अशी रास्त मागणी शहरातील नागरिकांतून केली जाते आहे

छत्रपती शिवाजी नगर मधील याच घरासमोर आसलेल्या श्री पुरी यांच्या घरी मागील सहा महिन्यापूर्ण चोरी झाली होती. त्यानंतर अनेकांनी आपापल्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत, यामुळं पोलिसांना चोरट्यांच्या हालचाली वरुन तपास करणे सोयीचे होणार आहे, ही बाब लक्षात घेता पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि नागरिकांना संपर्क साधण्यासाठी पोलीस ठाण्यात शासकीय दूरध्वनी असायला हवा अशी मागणी होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments