नांदेड| बस स्थानकातून कर्नाटक येथील कलबुर्गी येथे गेलेल्या बसच्या कंडक्टर ड्रायव्हरला कन्नड भाषिकांनी महाराष्ट्राच्या कंडक्टर ड्रायव्हर ड्रायव्हरचा अपमान करून परत पाठवले त्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे प्रकाश मारावार यांच्या नेतृत्वखाली नांदेड बस स्थानकात आलेल्या कर्नाटक येथील बसेस अडवून कन्नडी कंडक्टर.ड्रायव्हर यांना झालेला प्रकाराचा शिवसेना स्टाईल जाब विचारण्यात आला तब्बल तीन तास कन्नडी बसेस अडवून कानडी भाषकांचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला.


कर्नाटकात नांदेड कलबुर्गी या बस मधील ड्रायव्हर नामदेव पप्पूले. कंडक्टर संदीप किरवले यांना ज्या पद्धतीने अपमान करण्यात आला त्याचा बदला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व एसटी कामगार सेनेच्या वतीने घेण्यात आला. कन्नडी बसेसच्या परमिट नसल्यामुळे गाड्या थांबविण्यात आल्या.

कनाडी चालक वाहक यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर गाड्या सोडण्यात आल्या. नांदेड आगार प्रमुख श्री बल्लाल यांनी याप्रसंगी तात्काळ भूमिका घेऊन पोलीस प्रशासन व आरटीओ यांना कळून कर्नाटकच्या परमिट नसलेल्या बसेस जप्त करण्याची विनंती केली.

शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश मारावार. युवा सेनेचे मनोज यादव. ज्येष्ठ शिवसैनिक भाया शर्मा. एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव सुधीर पटवारी. विभागीय अध्यक्ष जय कांबळे विभागीय सचिव सीपी कदम यांनी कन्नडी भाषिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे मागणी डेपो मॅनेजर श्री बल्लाल यांच्याकडे केली.

वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री लोंढे यांनी कर्नाटक एसटी वाहक चालक आणि महाराष्ट्रातील एसटी वाहक व शिवसेना पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधून कन्नडी वाहक चालकांना माफी मागायला लावल्यानंतर गाड्या सोडून देण्यात आल्या. यावेळी नांदेड डेपो मधील शेकडो वाहक चालक उपस्थित होते.