Thursday, May 14

Pramod Maharaj Chodikar ; नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा वतीने हडको येथे हभप.प्रमोद महाराज चोडीकर याचे किर्तन

नवीन नांदेड l शिवजन्मोत्सव निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून यावर्षी प्रथमच नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा वतीने हडको येथे 2 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध किर्तनकार हभप.चौडीकर महाराज यांच्या किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या किर्तन सोहळ्याला प्रसंगी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त डॉ.बेग,मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे,भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे , शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, यांच्या नांदेड दक्षिण तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष जिवन पाटील घोगरे.

शिवसेना शहरप्रमुख तुलजेश यादव, वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष विठ्ठल गायकवाड,
शिवसेना सिडको शहरप्रमुख सुहास पाटील खराणे,ऊबाठा गटाचे सिडको शहरप्रमुख जितुसिंग टाक, वाघाळा ब्लाँक काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेश शिंदे,जिल्हा परिषद माजी सदस्य मनोहर पाटील शिंदे, गंगाप्रसाद काकडे यांच्या सह सिडको परिसरातील माजी नगरसेवक राजू पाटील काळे,संजय घोगरे पाटील,ऊदय देशमुख,राजु गोरे, सिध्दार्थ गायकवाड,संजय इंगेवाड, सौ.बेबीताई गुपीले, यांच्या सह वृक्ष मित्र मोहन पाटील घोगरे, विनोद कांचनगिरे,राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हभप प्रमोद महाराज चौडीकंर हे प्रसिद्ध किर्तनकार असुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन चरित्र व किर्तन माध्यमातून समाजप्रबोधन करणार आहेत,या सोहळ्याला जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे कार्याध्यक्ष रमेश ठाकूर, उपाध्यक्ष शाम जाधव, सचिव निळकंठ वरळे पाटील, कोषाध्यक्ष सारंग नेरलकर, सल्लागार किरण देशमुख, तुकाराम सावंत,अनिल धमणे पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!