नांदेड| महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने दैनिक गावकरीने प्रकाशित केलेल्या महाशिवरात्री विशेष पुरवणीचे प्रकाशन मंदिर कमेटीसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दैनिक गांवकरीने श्री परमेश्वर मंदिराबाबत छापलेल्या सविस्तर लेखाचं उपस्थित मान्यवरांसह अनेकांनी भरभरून कौतूक केल आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने अनिल मादसवार हे मंदिराचे संचालक पद सांभाळत डिजिटल, प्रिंट मीडियासह वेगवेगळ्या माध्यमातून श्री परमेश्वर देवाची महिमा आख्यायिका दूरदूरपर्यंत प्रसारित करण्याचे काम करत आहेत. महाशिवरात्री यात्रेच्या सुरुवातीपासून प्रकाशित केलेल्या बातम्यांमुळे भाविक भक्तांची होऊ लागलेली अफाट गर्दीमुळे श्री परमेश्वर मंदिराच्या यात्रेला रंग चढु लागल्याने दिसुन आले आहेे. महाशीवरात्रीच्या दिवशी लाखो भाविकांनी श्री परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

महाशिवरात्रीचे औचित्य साधून दैनिक गांवकरी ने हेमाडपंथी श्री परमेश्वर मंदिराबाबत छापलेल्या विषेश पुरवणीच प्रकाशन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित जेष्ठ पत्रकारांनी प्रशंसा करून दैनिक गावकरीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सेक्रेटरी अनंतराव देवकते, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, सोपान बोम्पीलवार, मारोती वाडेकर, दत्ता पोपलवार, प्रवीण कोमावार, रामराव पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, उदय देशपांडे, केदार ताटेवाड आदींसह अनेक नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते.
