श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे। नांदेडचे नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी बुधवार दि.२६ फेब्रु. रोजी श्री रेणुकामातेचे दर्शन घेऊन आरती केली.या पूजाविधीचे पौरोहित्य विश्वस्त चंद्रकांत भोपी व संजय काण्णव यांनी केले. दर्शनानंतर मंदिर कार्यालयात संस्थानच्या वतीने दोन्ही विश्वास्तांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव व प्रभारी पो. नि. शिवप्रकाश मुळे यांची उपस्थिती होती.


जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारल्यानंतर राहुल कर्डीले हे प्रथमच माहूरगडला आले होते.शासकीय विश्रामगृहात प्रथम त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे यांचेकडून श्री रेणुकादेवी मंदिरा पायथ्याशी सुरु असलेल्या लिफ्ट्सह स्काय वॉक कामाच्या प्रगतीची माहिती घेतली.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली, तहसीलदार किशोर यादव, उपकार्यकारी अभियंता देवराव भिसे, शाखा अभियंता रवींद्र उमाळे, आकाश राठोड व प्रभारी पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांचेसह मंडळाधिकारी व महसूल अधिकारी यांची उपस्थिती होती. शासकीय विश्रामगृहात नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्ता मोहिते,मेघराज जाधव,श्री रेणुका माऊली व्यापारी असो.चे अध्यक्ष दिगंबर घोगरे पाटील, मुख्य सल्लागार वसंत कपाटे, उपाध्यक्ष गोविंद आराध्ये,विनोद भारती व राजु सौंदलकर यांनी त्यांचा सत्कार केला. जिल्हाधिकारी कर्डीले यांनी माहूर दौऱ्यात यात्री निवास,मातृतीर्थ तलाव व रेणुकागडावरील लिफ्ट्सह स्कायवॉकच्या कामाची पाहणी केली.
