छ.संभाजीनगर l महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग मुंबई यांचे मार्फत देण्यात येणारा अत्यंत मानांकित बाल स्नेही पुरस्कार छत्रपती संभाजी नगरचे कर्तवदक्ष जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी (भा प्र से) यांना घोषित करण्यात आला आहे.


बाल हक्क,बालकांचे जीवन सुधारण्यासाठी ,त्यांचे संवर्धन,संस्कार ,शिक्षण इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विभागातून त्यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी या संवर्ग मधून निवड करण्यात आलेली आहे.

दिनांक 3 मार्च रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री ना श्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री ना श्री अजित पवार ,श्रीमती आदिती तटकरे महिला बाल कल्याण मंत्री व इतर मान्यवरांचे उपस्थितीत हा पूरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे..
