नांदेड| राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) यांचे नांदेडच्या गुरुगोविंद सिंह जी विमानतळावर एक दिवसाच्या दौऱ्यासाठी दुपारी दीडच्या सुमारास आगमन झाले. त्यांच्यासोबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते.



नांदेडच्या गुरु गोविंद सिंह जी विमानतळावर त्यांचे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आ. हेमंत पाटील,आ. बालाजी कल्याणकर,आ.बाबुराव कदम कोहळीकर,आ.संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदींची उपस्थिती होती.



विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री.हुजूर साहिब सचखंड गुरूद्वाराकडे रवाना झाले. दुपारी दोनच्या सुमारास ते येथील नवा मोंढा मैदानावर जाहीर आभार सभेला संबोधित करतील.त्यानंतर विश्रामगृहावर विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत त्यांची बैठक आहे. सायंकाळी ते मुंबईकडे प्रयाण करतील.





