पीडित शेतकऱ्यांच्या सदस्यांना आ.माधवराव पाटील जवळगावकरांच्या हस्ते धनादेश प्रदान
हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीत अनेक जनावरे दगावल्याने शेतकरी नुकसानीत आले. अबेकानी आर्थिक संकटाने आत्महत्या केल्या तर काही शेतकऱ्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला होता. त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी शासनाकडून मदत उपलब्ध झाली असताना देखील प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड होत असून, याची माहिती मिळाल्याने मंगळवारी अचानक आमदार महोदयांनी तहसील कार्यालयास भेट देऊन आढावा घेतला. यावेळी मदतीचे धनादेश तयार असताना देखील लाभार्थ्यांना वितरित झाले नसल्याची बाब एक एक धनादेश आणला जात असल्याने समोर आली. केवळ यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे पीडित लाभार्थी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. यास कारणीभूत असलेल्याना आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी चांगलेच फाटकारून कारभारात सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
मागील काही महिन्यापासून हिमायतनगर येथील तहसील कार्यालयाचा अनागोंदी कारभार कोणत्या ना कोणत्या कारणाने चव्हाट्यावर येत आहे. यंदाच्या खरीप हंगामात निसर्ग कोपला आणि भूतो न भविष्यती अशी अतिवृष्टी झाली. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी राजा अमोठ्या आर्थिक अडचणीत आला आहे. वादळी वारे विजांच्या कडकडामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले तर वीज पडून, पुरात वाहून गेल्याने मुकी जनावरे दगवली. तर काही शेतकऱ्यांनी नापिकीमुळे आत्महत्या केली तर काहीं शेतकऱ्यांचा पुराच्या पाण्यात बुडून जीव गमवावा लागला होता. अश्या शेतकरी कुटुंबातील सदस्य निराधार झाले. त्यां सर्व पीडितांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाची मदत उपलब्ध झाली. मात्र हिमायतनगर तहसील कार्यालयातील संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याकडून पीडितापर्यंत मदत पोहोचवली गेली नाही.
त्यामुळे केवळ शेतकऱ्यांना वेठीस धरून मदतीचा धनादेश देण्यात टाळाटाळ झाली असल्याच्या तक्रारी अनेकांनी आ.जवळगावकर यांच्याकडे केल्या होत्या. दि.२० डिसेंबर मंगळवारी हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे लोकनेते आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी हिमायतनगर तहसील कार्यालयास दुपारी अचानक भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याकडून विविध कामात होत असलेला हलगर्जीपणा समोर आला आहे. तहसील कार्यालयातील अपत्य नोंदी, वितरण व्यवस्था, आधार लिंक यासह अनेक समस्या समोर आल्या आहेत. यावेळी आमदार जवळगावकर यांनी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून माहिती मागितली असता अनेकांना आपण करत असलेल्या कामकाजाची माहिती सांगता आली नाही.
त्यां कर्मचाऱ्याकडून चालविला जात असलेला मनमानीपणा समोर आला आहे. यामुळे जनतेच्या कामाबाबत दिरंगाई होत असल्याचे लक्षात आल्याने आ. जवळगावकरांनी संबंधित कर्मचाऱ्यांना उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार डी.एन. गायकवाड यांच्यासह पत्रकारांच्या उपस्थितीत चांगलेच फटकारले आहे. यापुढे सर्वसामान्य जनतेच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, यात सुधारणा करुन शेतकरी, सामान्य जणतेसह पीडितांना सहकार्य करा अश्या सूचना त्यांनी दिल्या. त्यांनी दिलेल्या सूचनेनंतर तरी हिमायतनगर तहसील कार्यालयातील कामकाजात सुधारणा होईल काय..? याकडे शहरासह तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.
दर महिन्याला अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जनता दरबार भरविला जाणार – आ.जवळगावकर
हिमायतनगर शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला विविध कामासाठी तहसील, पंचायत समिती, महावितरण कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. या अडचणी एकाच छताखाली तात्काळ सोडविण्यासाठी यांनतर दर महिन्याला अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जनता दरबार भरविला जाणार आहे. जेणेकरून जनतेला शक्य त्या समस्या कमी वेळेत निकाली निघतील आणि होणारी हेळसांड थांबून जनतेचं, अधिकाऱ्यांचा संवाद होऊन कामकाजात सुसूत्रपणे येईल यासाठी जनता दरबार भरविला जाईल. अशी माहिती हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.
पीडित शेतकऱ्यांच्या सदस्यांना आ.माधवराव पाटील जवळगावकरांच्या हस्ते धनादेश प्रदान
अतिवृष्टीच्या काळात वीज पडून जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणारी मदतीच्या धनादेशाचे वितरण आज आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते आज तालुक्यातील ४ शेतकऱ्यांना करण्यात आले. यावेळी माजी जी.प.सदस्य सुभाष राठोड, माजी संचालक रफिक सेठ, माजी तालुकाध्यक्ष जनार्धन तांडेवाड, नाजीमचे संचालक गणेशराव शिंदे, प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, परमेश्वर गोपतवाड, कानबा पोपलवार, शहराध्यक्ष संजय माने, संतोष शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, श्रीदत्त पवार, शहरातील पत्रकार आदींसह अनेकांची उपस्थिती होती.