HomeनांदेडEmployment Motivation Program : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे...

Employment Motivation Program : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे उघोजगता प्रेरणा कार्यक्रम -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| १२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन हा ‘जागतिक युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त माहूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे रविवार दि,१२ जानेवारी रोजी दु,१वा. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन व या संस्थेतून यशस्वी उघोजक म्हणून नावारूपास आलेले व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ‘गौरव’ तज्ञांचे मार्गदर्शन व विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य फारूखी ऐ,वासे यांनी दिली.

१२ जानेवारी या दिवशी ‘स्वामी विवेकानंद’ यांची जयंती असून, हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून भारतभर साजरा करण्यात येतो, या दिनाचे औचित्य साधत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील युवकांच्या विविध कलागुणांना तसेच कौशल्यांना वाव मिळावा व प्रोत्साहन मिळावे, यासाठी, वाद-विवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पारंपारिक क्रीडा, चित्रकला, त्याचबरोबर निबंध स्पर्धेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत संस्थेतील जास्तीत जास्त आजी माजी विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य फारूखी यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments