नांदेडलाइफस्टाइल

Pradeep Naik’s : माजी आ. प्रदीप नाईक यांच्या अस्थि कळशाचे काळेश्वर नदीकाठी विसर्जन – NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट ,माहूर विधानसभा मतदार संघाचे माजी आ. तथा लोकनेते प्रदीप नाईक यांच्या अस्थिचे काळेश्वर मंदिर नदीकाठी दि. 10 जानेवारी शुक्रवार रोजी विसर्जन करण्यात आले असून त्यांच्या अस्थि दर्शनाला कार्यकर्त्यानी मोठ्या प्रमाणावर नदीकाठी उपस्थिती दर्शवली होती.

किनवट विधानसभेचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे दि. 1 जानेवारी रोजी दुःखद निधन नववर्षाच्या दिवशी पहाटे हृदय विकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले. त्यांची अंत्यविधी दि. 2 जानेवारी रोजी मुळगाव दहेली तांडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे अस्थिकलश मूळगावी दहेली तांडा येथुन दि. 10 जानेवारी शुक्रवार रोजी सारखणी ,किनवट, बोधडी ईस्लापूर मार्गे नांदेड येथील काळेश्वर मंदिर नदीकाठी आणण्यात आले. या अस्थी कलशाचे जागो जागी नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी दर्शन घेत पुष्पवृष्टी केली.

यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त करत मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. काळेश्वर येथील नदीकाठी त्यांचे चिरंजीव कपिल नाईक, राहुल नाईक, बबलू नाईक, अंकुर नाईक,मयुर नाईक,यांनी मुंडन करत विधिवत पूजा करून सदरील अस्थि कलश गोदावरी नदीमध्ये विर्सजीत करण्यात आले. या नदीकाठी जमलेले कार्यकर्ते यांनी प्रदीप नाईक अमर रहे,अमर रहे घोषणा देत भाऊक झाले होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button